Chhatrapati Sambhajinagar: 'त्या' क्लिपने पोलिसांना खुन्यापर्यंत पोहोचवले; 'हेडलेस' मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश

Chhatrapati Sambhajinagar Murder Case: एखाद्या क्राईम सिरियलला शोभेल अशा या घटनेचा पर्दाफाश छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी केला आहे

जाहिरात
Read Time: 3 mins
Chhatrapati Sambhajinagar : घनदाट जंगलात एका 25 ते 30 वर्षांच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhajinagar Murder Case:  एका मित्राने दुसऱ्या मित्राची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण मृतदेहाच्या जबड्यातील एका क्लिपने पोलिसांना खुन्यापर्यंत पोहोचवले. एखाद्या क्राईम सिरियलला शोभेल अशा या घटनेचा पर्दाफाश छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी श्रावण ज्ञानेश्वर धनगर याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्यातील सायगव्हाण शिवारात घनदाट जंगलात एका 25 ते 30 वर्षांच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. आरोपीने या व्यक्तीचा गळा कापून त्याचे मुंडके धडापासून वेगळे केले होते. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकून दिला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मृतदेहावरील अंडरवेअर, हातातील घड्याळ आणि विशेषतः त्याच्या जबड्यात बसवलेली एक क्लिप आढळून आली. या क्लिपच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांनी वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटून क्लिपबद्दल माहिती घेतली. अखेरीस, एसएमबीटी हॉस्पीटल नांदीहिल्स, घोटी (जि. नाशिक) येथे ही क्लिप बसवण्यात आल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी या रुग्णालयात जाऊन तपास केला असता, ही क्लिप निखिल हिरामण सूर्यवंशी (वय 28, रा. सिंदी, जि. जळगाव) या व्यक्तीस बसवण्यात आल्याचे समोर आले.

Advertisement

( नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar : 'घरी कधी येताय?' असं विचारणाऱ्या लेकीने घेतला गळफास, संभाजीनगरचा धक्कादायक प्रकार )
 

कशी ओळख पटली?

पोलिसांनी निखिल हिरामण सूर्यवंशी याची माहिती काढली असता, त्याच्या कुटुंबीयांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तो हरवल्याचा (missing) रिपोर्ट दाखल केल्याचे समजले. पोलिसांनी निखिलच्या कुटुंबीयांना मृतदेहावरील कपडे आणि जबड्यातील क्लिप दाखवली. त्यांनी ही ओळख पटवली आणि मृतदेह निखिलचाच असल्याचे सिद्ध झाले.

निखिलची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी दोन पथके शिंदी गावात पाठवली. त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन सुमारे 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. शिंदी, वडरा, सायगव्हाण, चाळीसगाव या परिसरातील निखिलचे मित्र, नातेवाईक, शेजारी आणि ओळखीच्या लोकांची चौकशी केली. या तपासात निखिल हा रोजंदारीवर काम करायचा, बकऱ्यांची चोरी करायचा आणि गावामध्ये गुंडगिरी करायचा अशी माहिती समोर आली. त्याचा मित्र श्रावण धनगर याला याची सर्व माहिती होती, त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.

Advertisement

( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये परप्रांतीय दुकानदाराची मुजोरी; मराठी तरुणीने चपलेने बदडले, पाहा Video )
 

पोलिसांनी श्रावणची कसून चौकशी केली. त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तो रडू लागला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

का केली हत्या?

श्रावणनं पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबानुसार,  26 ऑगस्ट रोजी निखिलने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या मैत्रिणीला भेटायला जाण्यासाठी सोबत घेतले. वाटेत सायगव्हाणमार्गे सनसेट पाँईटजवळ आल्यावर निखिलने श्रावणला सांगितले की, "मी चोऱ्या करतो, गुंडगिरी करतो, दारू पितो. माझी सर्व लफडी तुला माहिती आहेत. तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी होत आहे. आज तुझा शेवटचा दिवस आहे, तू जर मेलास तर माझे लग्न होईल आणि माझ्या सर्व अडचणी दूर होतील." असे म्हणून त्याने श्रावणवर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी श्रावणने निखिलच्या गुप्तांगावर लाथ मारली. निखिल खाली पडताच श्रावणने त्याच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि त्याच्या मानेवर वार करून त्याचे शिर धडापासून वेगळे केले.
 

Advertisement