Dog Bites : सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविषयी चिंता व्यक्त केली होती. सर्व भटके कुत्रे पकडा आणि एकत्र करुन निवारा केंद्रात नेऊन सोडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ दिल्लीतच नाही तर महाराष्ट्रातही आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एन-7 सिडको परिसरात एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास 14 जणांचे लचके तोडल्याची घटना समोर आली आहे.
नक्की वाचा - UP Crime: लेकीच्या बर्थडे पार्टीत वडिलांची निर्घृण हत्या, गाण्याचा आवाज वाढवल्याने शेजाऱ्याने संपवलं
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. या मोकाट कुत्र्याला पकडण्यासाठी मनपाच्या पथकाशी संपर्क साधल्यानंतरही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. एक ज्येष्ठ नागरिक पायी जात असताना समोरून आलेल्या मोकाट कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. चेहऱ्यावर आणि हाताचे मोकाट कुत्र्याने लचके तोडले. यावेळी अन्य नागरिकांनी धाव घेऊन मोकाट कुत्र्यापासून त्यांची सुटका केली. अशाच प्रकारे परिसरातील अन्य लोकांवर या कुत्र्याने हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले. काहींनी घाटी रुग्णालयात, तर काहींनी परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुत्रा चावल्यानंतर ही लक्षणं असतील तर सावध व्हा...
- वारंवार ताप येणं
- भूक कमी होणं
- उलटीसारखं होणं
- हगवण लागणे
- नाक गळणे
- सतत शिंक येणे
- हात-पायात सूज
- जळजळ
कुत्रा चावल्यानंतर काय करायला हवं?
- कुत्र्याने चावा घेतलेली जखम स्वच्छ करून घ्या
- ही जखम १० ते १५ मिनिटापर्यंत अँटीसॅप्टिक सोप किंवा स्वच्छ पाण्याने धुवा
- जखम स्वच्छ केल्यानंतर त्यावर अँटीसेप्टिक लावा
- इतक्या वेळानंतर रक्तस्त्राव कमी झाला असेल. जर असं झालं नाही तर पट्टी लावून रक्कस्त्राव रोखा
- आता लगेल डॉक्टरांकडे जावं.