Chhattisgarh News: नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश! 23 लाखांचे बक्षीस असलेल्या 13 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Chhattisgarh Naxalites' News: एओबी विभागांतर्गत पीएलजीए सदस्य, मिलिशिया प्लाटून सदस्य, 23 लाख रुपयांचे बक्षीस असे एकूण 13 नक्षलवादी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

 मनीष रक्षमवार, छत्तीसगड : गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवादविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरु आहेत. आत्तापर्यंत झालेल्या सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये शेकडो नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून अनेकांनी आत्मसमर्पणही केले आहे. याचबाबत आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून विजापूरमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश आले आहे. विजापूरमध्ये 23 लाखांचे बक्षीस असलेल्या 13 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 

(नक्की वाचा : Kalyan : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाला पळवण्याचा प्रयत्न, आईच्या समोरच घडला थरारक प्रकार! )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेला शुक्रवारी सायंकाळी मोठे यश मिळाले. प्रत्यक्षात, नक्षलवाद्यांच्या पश्चिम बस्तर विभागांतर्गत कंपनी क्रमांक 2 चा एक पक्ष सदस्य, एसीएम, केएएमएस अध्यक्ष, धमतरी-गरियाबंद-नुआपाडा विभागांतर्गत एलओएस सदस्य, एओबी विभागांतर्गत पीएलजीए सदस्य, मिलिशिया प्लाटून सदस्य, 23 लाख रुपयांचे बक्षीस असे एकूण 13 नक्षलवादी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

याबाबत बोलताना एसपी जितेंद्र यादव यांनी सांगितले की, अंतर्गत भागात नवीन सुरक्षा छावण्या स्थापन झाल्यामुळे, रस्ते, वाहतूक सुविधा, पाणी, वीज आणि सरकारच्या इतर कल्याणकारी योजनांचा विस्तार यासारख्या विकासाभिमुख कामांचा गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. सुरक्षा दलांचा ग्रामस्थांशी सकारात्मक संवाद, कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती आणि छत्तीसगड सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणाची व्यापक प्रसिद्धी यामुळे माओवादी संघटनेबद्दलचा मोहभंग झाला आहे.

(नक्की वाचा-  Dombivli : डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सापडले 2 कोटींचे ड्रग्ज! घर पाहून पोलीसही हादरले)