मोठी कारवाई! नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार, 3 जवान जखमी

नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 7 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर 3 जवान हे जखमी झाले आहेत.  

Advertisement
Read Time: 2 mins
रायपूर:

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडच्या नक्षलवादी प्रभावीत असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत 7 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर 3 जवान हे जखमी झाले आहेत. नारायणपूर, दंतेवाडा आणि कोंडागावच्या सीमेवर ही चकमक झाली. याभागात नक्षलवादी येणार असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नक्षलवाद्यांनी यामध्ये सर्वात आधी गोळीबार सुरू केला. त्याला उत्तर म्हणून सुरक्षादलाच्या जवानांनीही जोरदार गोळीबार केला. दिवसभर हा गोळीबार काही अंतराने सुरू होता. यात 7 नक्षलवाद्यांचे मृतदेह सुरक्षादलाच्या हाती लागले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जखमी झाले असल्याचा अंदाज आहे. दरम्यान या कारवाई दरम्यान सुरक्षा दलाचे जवानही जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रायपूरला हलवण्यात आले आहे.  

हेही वाचा -  Ramoji Rao Passed Away: रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ही संयुक्त मोहीत होती. डीआरडी आणि भारत तिबेट सीमा पोलिस यांनीही कारवाई केली. या कारवाईनंतर या वर्षात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत आतापर्यंत जवळपास 123 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या आधी 23 मे झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी मारले गेले होते. तर 10 मे ला झालेल्या कारवाईत बिजापूर जिल्ह्यात 12 नक्षलवादी मारले गेले होते. 

Advertisement