Crime News: नोकरीचे आमिष.. दोन तरुणांकडून 13 लाख रुपये लुटले; आरोपी फरार

शरद विजयकुमार पवार असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचं नाव असून तो सोलापूरचा आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, चिपळूण: नोकरीच्या आमिषाने दोन तरुणांचे 13 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चिपळूणमधून समोर आला आहे. सुभाष घाडगे असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून शरद पवार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा सविस्तर..

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे एकाने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघा जणांची तब्बल 13 लाख 24 हजार 800 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद विजयकुमार पवार असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचं नाव असून तो सोलापूरचा आहे. 

Advertisement

सुभाष भगवान घाडगे यांनी याबाबत तक्रार दाखल केली. त्यांची आणि साक्षीदार शेषराव येनाजी राठोड यांची आरोपी शरद विजयकुमार पवार याने 15 मार्च 2024 ते 11 जुलै 2024 या कालावधीत ही आर्थिक फसवणूक केली. आरोपी शरद पवार याने सुभाष घाडगे यांना 9 लाख 4 हजार 800 रुपये आणि शेषराव राठोड यांना 4 लाख 20 हजार रुपये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. अशा प्रकारे एकूण 13 लाख 24 हजार 800 रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असं फिर्यादीत म्हटलं आहे. पोलीस याबाबतचा ्अधिक तपास करत आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा :  Exclusive: काश्मीरला जा, फोटो घे... ISI एजंट आणि हेर यांच्यात काय झाली चर्चा? )

Topics mentioned in this article