जाहिरात

Exclusive: काश्मीरला जा, फोटो घे... ISI एजंट आणि हेर यांच्यात काय झाली चर्चा?

पाकिस्तानमध्ये बसलेला ISI एजंट आणि भारतामध्ये हेरगिरी करणाऱ्या व्यक्तींमधील व्हॉईस कॉल आणि चॅट्स सुरक्षा यंत्रणांच्या हाती  लागले आहेत.

Exclusive: काश्मीरला जा, फोटो घे... ISI एजंट आणि हेर यांच्यात काय झाली चर्चा?
Spy Noman : नोमनला हरियाणातून अटक करण्यात आले आहे.
मुंबई:

भारताच्या लष्करी तळांची हेरगिरी करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्यानं सुरु आहेत. पाकिस्तानमध्ये बसलेला ISI एजंट आणि भारतामध्ये हेरगिरी करणाऱ्या व्यक्तींमधील व्हॉईस कॉल आणि चॅट्स सुरक्षा यंत्रणांच्या हाती  लागले आहेत. पाकिस्तानात बसलेला आयएसआयचा हँडलर इक्बाल काना आणि अटक करण्यात आलेला भारतीय हेर नोमान यांच्यातील हा संवाद आहे. हे संभाषण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान झाले होते. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे त्यांच्याच शब्दात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इक्बाल आणि नोमान यांच्यातील बातचीत

नोमान: साहेब, प्लीज मला माफ करा, माझी काय चूक आहे? तुम्ही माझ्यासाठी बसला आहात.

इक्बाल: तू माझे काम करणार आहेस की नाही? आता कधी करणार काम? आर्मीचे दोन प्रिंट दे.

नोमान: दोन दिवस फक्त जनाब.

इक्बाल: काश्मीरला जा आणि कॅन्टचे फोटो घेऊन ये.

नोमान: जी जनाब.

इकबाल: गुड.

आयएसआयचा हँडलर इक्बाल काना आणि नोमान यांच्यातील हे व्हायरल संभाषण बरंच काही सांगून जातं.

Spy Racket : पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी गेली आणि हेर बनली! ISI एजंट महिला YouTuber सह 6 जणांना अटक

( नक्की वाचा :  Spy Racket : पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी गेली आणि हेर बनली! ISI एजंट महिला YouTuber सह 6 जणांना अटक )

व्हॉइस चॅटमध्ये रेल्वेबद्दल मागितली माहिती

यानंतर इक्बाल आणि नोमान यांच्यातील एक व्हॉइस चॅट देखील समोर आली आहे. त्यामध्ये इक्बाल बोलत आहे की जम्मू-काश्मीरच्या दिशेने जालंधर आणि अमृतसरमार्गे जी ट्रेन येते, तिची लोकेशन पाठव आणि जाऊन बघ त्यात किती लोक येत आहेत. इक्बालला उत्तर दिल्यानंतर नोमानने त्याचे व्हॉइस चॅट्स डिलीट केले.

 6 भारतीय पासपोर्ट जप्त

नोमानकडून एकूण 6 पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.  हे सर्व भारतीय पासपोर्ट आहेत आणि प्रत्येक पासपोर्टमध्ये पाकिस्तानची एंट्री आहे. तसेच नोमानकडून पाकिस्तानचे संशयास्पद कागदपत्र देखील मिळाली आहेत.  ऑपरेशन सिंदूर दरम्यान नोमान सातत्याने आयएसआयचा हँडलर इक्बाल कानाशी बोलत होता.

( नक्की वाचा : Yatri Doctor : कोण आहे यात्री डॉक्टर? पाकिस्तानी गुप्तहेर ज्योती मल्होत्राशी त्यांचे काय आहे कनेक्शन? )
 

कोण आहे नोमान?

नोमान इलाही याला हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. नोमान हा मूळचा कॉम्प्युटर ऑपरेटर होता. मात्र तो पाकिस्तानसाठी काम करणारा 'डार्क वेब' हेर होता. रेल्वे आणि मिलिटरी हालचालींशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती त्याने परदेशी नंबरवर पाठवली होती. नोमाने चौकशीमध्ये ही कबुली दिली आहे. त्याने पैसे घेऊन लोकांकडून यूएसबी ड्राइव्ह आणि कागदपत्रे घेतली. ती डार्कनेटद्वारे अपलोड केली.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com