कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये कैद्यांमध्ये राडा, कारण काय?

या घटनेनंतर तुरूंग प्रशासन हादरून गेले आहे. त्यांनी तातडीने या प्रकरणी खडकपाड पोलिस स्थानकात गुन्हा ही दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये जुन्या वादातून एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर प्लेटच्या तुकड्याने वार केल्याची घटना  घडली आहे. याप्रकरणी जेल अधिकाऱ्यांने संबधीत कैद्या विरोधात खडकपाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या जेलमध्ये  कैदी युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार हा आहे. लोहार याचे  कैदी रोशन घोरपडे यांच्यासोबत यापूर्वी भांडण झाले होते. त्यांच्यातल्या जुन्या वादामुळेही जेलमध्ये राडा झाल्याचे बोलले जात आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आधारवाडी जेलमध्ये युवराज नवनाथ पवार हा कैदी शिक्षा भोगत आहे. तिथेच रोशन घोरपडे हा दुसरा कैदीही आहे. या दोघांमध्ये पहिल्यापासून वैर होते. यातूनच या दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी अरविंद  उर्फ मारी रविंद्र राम याने पुढाकार घेतला. त्याने यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. दोघेही एकमेकावर तुटून पडले होते. 

ट्रेंडिंग बातमी - धक्कादायक! एकाच पद्धतीनं झाल्या 9 महिलांच्या हत्या, मारेकरी मोकाट! सीरिअल किलरची सर्वत्र दहशत

मात्र हे भांडण सुरू असताना रविंद्र राम हा पुढे आला आहे हे युवराजच्या लक्षात आहे. युवराज आणि याच रविंद्र रामचाही पंगा सुरू होता. भांडण सोडवले गेले. पण त्याचा राग युवराजने मनात धरला. त्याने संधी साधत दात घासण्याच्या ब्रशने आणि तटलेल्या प्लेटच्या माध्यमातून रविंद्र राम याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रविंद्र याच्या गालावर आणि डोक्यावर वार झाले आहेत. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. 

ट्रेंडिंग बातमी -  सायको किलर! महिलांना शरीर संबध ठेवण्यास सांगायचा, नकार देताचं भयंकर करायचा 

या घटनेनंतर तुरूंग प्रशासन हादरून गेले आहे. त्यांनी तातडीने या प्रकरणी खडकपाड पोलिस स्थानकात गुन्हा ही दाखल केला आहे. या आधीही अशाच घटना आधारवाडी जेलमध्ये घडल्या आहेत. तर काही वेळा कैद्यांनी या जेलमधून पळून जाण्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. त्यामुळे जेलमधील सुरक्षेचाच प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. शिवाय कैद्यांमध्ये ऐवढी हाणामारी होई पर्यंत जेलमधील सुरक्षा यंत्रणा काय करत होती असाही प्रश्न निर्माण होत आहे. 

Advertisement