Murder in School : शाळेच्या आवारातच दहावीच्या विद्यार्थ्याची ज्युनियरनं केली हत्या, राज्यभर वातावरण तापलं

Ahmedabad School Murder : दहावीतील विद्यार्थ्याचा त्याच्याच शाळेतील ज्युनियरने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ahmedabad School Murder : दहावीचा विद्यार्थी नयनची शाळेच्या आवारातच हत्या करण्यात आली.
मुंबई:

Ahmedabad School Murder : दहावीतील विद्यार्थ्याचा त्याच्याच शाळेतील ज्युनियरने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पालक आणि स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी शाळेबाहेर निदर्शने केली. ही घटना अहमदाबादच्या खोखरा येथील सेव्हन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलच्या आवाराबाहेर हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अल्पवयीन मुलाला Juvenile Act (अल्पवयीन कायद्यांतर्गत) अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

अहमदाबादच्या सेव्हन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलची मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे घंटा वाजली.  शाळा सुटल्यानंतर दहावीचा विद्यार्थी नयन आपली बॅग भरून घराकडे निघाला. तो शाळेच्या इमारतीतून बाहेर पडताच 8 वीतील एक ज्युनियर आणि इतर काही मुलांनी त्याला घेरले. त्यांच्यातील शाब्दिक वादाचे लवकरच हाणामारीत रुपांतर. 8 वीच्या मुलाने चाकू काढून नयनवर वार केले आणि तो घटनास्थळावरून पळून गेला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये नयन पोटावर हात ठेवून जखमी अवस्थेत शाळेच्या आत जाताना दिसत आहे. त्याला तातडीने मणिनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

( नक्की वाचा : 'आईनं 2 पेग घेतले ..', अलवरच्या ‘मुस्कान'ने प्रियकरासोबत पतीची केली हत्या, 8 वर्षांच्या मुलानं सांगितलं रहस्य )
 

दरम्यान, आरोपी शाळेच्या मागच्या बाजूला पळून गेला. मात्र, शाळेच्या सुरक्षा रक्षकाने त्याला पाहिले आणि याची माहिती शाळा प्रशासन आणि पोलिसांना दिली.

Advertisement

पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत.

या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी (बुधवार, 20 ऑगस्ट) मोठ्या संख्येने लोक सेव्हन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट स्कूलजवळ जमले होते. संतप्त पालक आणि ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) कार्यकर्त्यांनी शाळेची तोडफोड केली आणि कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला, त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले.

Advertisement

गुजरातचे शिक्षण मंत्री प्रफुल्लभाई पानसेरिया यांनी नयनच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आंदोलन करणाऱ्या पालकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पानसेरिया यांनी नयनला न्याय मिळेल असे आश्वासन दिले. तसेच, मुलांमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अभ्यास करण्याची गरज  त्यांनी व्यक्त केली. 

Topics mentioned in this article