Himani Narwal: घरी बोलावलं, शरीरसंबंध ठेवले अन्... काँग्रेस नेत्याच्या मर्डरची धक्कादायक स्टोरी

आरोपीने हिमानीच्याच घरात तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे कबुल केले असून ज्या सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह सापडला ती देखील हिमानीच्या घरातील होती असा धक्कादायक खुलासा केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

हरियाणा: हरियाणातील रोहतकमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हिमानी नरवाल यांचा खून करुन मृतदेह एका सुटकेसमध्ये फेकून दिला होता. या भयंकर हत्याकांडाच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका आरोपीला अटक केली आहे, ज्यामधून धक्कादायक खुलासा झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सचिन असे या आरोपीचे नाव असून तो बहादूरगडचा रहिवासी  आहे. आरोपीने हिमानीच्याच घरात तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे कबुल केले असून ज्या सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह सापडला ती देखील हिमानीच्या घरातील होती असा धक्कादायक खुलासा केला आहे. 

आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार,सचिन आणि हिमानी एकमेकांना एक- दीड वर्षांपासून ओळखत होते. तो मोबाईल दुकानाच्या एक्सेसरीजचा मालक असून त्याला दोन मुले आहेत. हिमानी आणि सचिनची सोशल मीडियावरुन ओळख झाली होती. याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तो अनेकदा हिमानीच्या घरी येत होता. 

ट्रेंडिंग बातमी - Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधानभवनात का पोहोचले?

धक्कादायक म्हणजे हिमानीने स्वतः त्याला घरी बोलावून घेतले. त्याच्याशी शारिरीक संबंध ठेवून त्याचा व्हिडिओही बनवला. याच व्हिडिओद्वारे ती त्याला ब्लॅकमेल करत होती आणि वारंवार पैशाची मागणी करत होती. या ब्लॅकमेलिंगमधून तिने आरोपीकडून लाखो रुपये उकळले, या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिची हत्या केल्याचे आरोपीने म्हटले आहे. 

Advertisement

घटनेदिवशीही हिमानीने त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती. यावरुनच दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने तिची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर आरोपीने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून फेकून दिला. दरम्यान, आरोपींकडून हिमानीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. सीआयए २ च्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली आहे.

ट्रेंडिंग बातमी - Women's day 2025 : महिला दिनानिमित्त 'लाडक्या बहिणीं'ना मोठं गिफ्ट; अकाऊंटमध्ये येणार एवढे पैसे