
8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींनी महिला दिनाच्या निमित्ताने एक खास गिफ्ट देण्यात येणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हफ्ता एकत्रितपणे 8 मार्चला लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे. त्यामुळे 8 मार्चला राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये तीन हजार रुपये टाकण्यात येणार आहे.
5 मार्चपासून याची प्रक्रिया सुरू होईल आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे ८ मार्चला खात्यात मिळतील, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world