नाशिकची 'ती' बडी कंपनी 'कॉर्पोरेट जिहाद' चा अड्डा ! मशिदीत ट्रेनिंग ते ऑफिसमध्ये बीफ, वाचा हादरवणारी माहिती

Corporate Jihad Nashik: नाशिकच्या त्या बड्या कंपनीत जिहादी रॅकेट कसे काम करत होते, याबद्दल एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Corporate Jihad Nashik: नाशिकच्या 'कॉर्पोरेट जिहाद'बाबत नवी माहिती उघड झाली आहे. (प्रतिकात्मक फोटो)
नाशिक:

सुजाता द्विवेदी, प्रतिनिधी

Corporate Jihad Nashik: नाशिकमधील एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) हिंदू तरुणींच्या धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाला आता 'कॉर्पोरेट जिहाद' असे संबोधले जात आहे. या संपूर्ण रॅकेटचे काम कसे चालायचे, याबद्दल एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे.

मशिदीमध्ये ट्रेनिंग आणि कंपनीत टार्गेट

साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, या कामासाठी काही तरुणांना मशिदींमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. हिंदू मुलींना जाळ्यात कसे ओढायचे आणि त्यांचे धर्मांतर कसे करायचे, यासाठी त्यांना पैसेही पुरवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, हे रॅकेट चालवण्यासाठी कंपनीच्या एचआर (HR) विभागाला हाताशी धरले गेले होते. या कामात मदत करण्यासाठी एचआरला मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवण्यात आले होते. हे सर्व प्रकार 2021 पासून कंपनीत सुरू असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

जेवणाच्या सुट्टीत ब्रेनवॉशिंग आणि बीफचा वापर

कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकचा वापर या कामासाठी केला जात असे. दुपारी जेवणाच्या वेळी आणि संध्याकाळी 4 नंतर टार्गेट केलेल्या कर्मचाऱ्यांचे ब्रेनवॉशिंग केले जाई. सुरुवातीला दोन मुलांचे धर्मांतर करण्यात आले, त्यांना कुराण वाचायला लावले गेले. या प्रक्रियेत अत्यंत गंभीर प्रकार म्हणजे, हिंदू कर्मचाऱ्यांना बकरीचे मटण असल्याचे सांगून 'बीफ' खायला दिले गेले. आधीच सांगितले असते तर कोणी खाणार नाही, हे माहित असल्याने त्यांची फसवणूक करण्यात आली.

व्हॉट्सअप ग्रुप आणि शोषणाचे रेकॉर्डिंग

या रॅकेटसाठी खास व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले होते. या ग्रुपच्या माध्यमातून मुलींना सूचना दिल्या जात असत. इतकेच नाही तर, ड्युटी संपल्यानंतर मुलींना ब्लॅकमेल करून किंवा काहींना पैसे देऊन हॉटेलमध्ये नेले जात असे. तिथे त्यांचे शोषण करून त्याचे रेकॉर्डिंग केले जाई. या व्हिडिओच्या आधारे मुलींना धमकावून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात असे. ज्यांनी या दबावाला बळी पडण्यास नकार दिला, अशा अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आणि काही जण तर नोकरी सोडून निघून गेले.

( नक्की वाचा : Nashik News : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचा धर्मांतरासाठी छळ; नमाजची सक्ती आणि बीफ खाण्याचा दबाव )

बुरखा आणि कुराणचे सक्तीचे धडे

या रॅकेटमध्ये अडकलेल्या महिलांना इस्लाम धर्मातील प्रथा, रोझा आणि इतर बाबींचे शिक्षण दिले जात होते. त्यांना बुरखा कसा परिधान करायचा आणि कुराणचे पठण कसे करायचे, याचे मार्गदर्शन कंपनीच्या आवारातच दिले जात असल्याचा गंभीर आरोप साक्षीदाराने केला आहे. या प्रकरणात आणखीही काही महिलांचे शोषण झाले असण्याची शक्यता असून त्या अद्याप समोर आलेल्या नाहीत.

सखोल चौकशीची मागणी

या प्रकरणात सहभागी असलेल्या काही जणांना तीन महिन्यांची सुट्टी देण्यात आल्याचेही उघड झाले आहे. कॉर्पोरेट ऑफिसच्या सुरक्षित वातावरणात इतके मोठे रॅकेट इतक्या दिवसांपासून कसे सुरू होते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रत्यक्षदर्शीने केली आहे.

Advertisement

इथे पाहा संपूर्ण VIDEO

Topics mentioned in this article