Court News: लैंगिक शोषण गुन्ह्यातील आरोपीशी पीडित तरुणीचा विवाह; कोर्टानं दिली विशेष परवानगी! कारण काय?

Court News : घराच्या विरोधाला झुगारून प्रेमाची कदर करणाऱ्या एका तरुणीने शेवटी असा निर्णय घेतला, ज्याची कल्पना कुटुंबीयांनीही केली नव्हती.

जाहिरात
Read Time: 2 mins
Court News : तरुणीनं तिची बाजू मांडताच कोर्टानं लग्नाला परवानगी दिली.
मुंबई:

Court News :  घराच्या विरोधाला झुगारून प्रेमाची कदर करणाऱ्या एका तरुणीने शेवटी असा निर्णय घेतला, ज्याची कल्पना कुटुंबीयांनीही केली नव्हती. ज्या तरुणाविरुद्ध नातेवाईकांच्या दबावाखाली बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती आणि ज्याला तुरुंगाची हवा खावी लागली होती, त्याच तरुणाशी तरुणीने शेवटी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक विरोध, कायदेशीर प्रक्रिया आणि सामाजिक दबावातून सुरू झालेली ही कहाणी अखेर थेट मध्यवर्ती कारागृहातील मंडपात सत्य परिणती झाली.

हा अत्यंत  चक्रावून टाकणारा प्रकार छत्तीसगडमधील जगदलपूर येथून समोर आला आहे. येथील परपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजूर गावात राहणारा सुरेश सेठिया आणि त्याची प्रेमिका एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते. दोघांनाही लग्न करायचे होते, परंतु दोघांची जात वेगळी असल्याने तरुणीच्या कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता. या वादातून तरुणीच्या घरच्यांनी पोलिसांत धाव घेत सुरेशविरुद्ध तक्रार दाखल केली.

Advertisement

काय आहे प्रकरण?

कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सुरेशविरुद्ध कलम 376 अंतर्गत म्हणजेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला तत्काळ अटक करून तुरुंगात पाठवले. कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली होती, पण या कथेला असा काही वळण मिळाले ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. सुरेश तुरुंगात गेल्यानंतर तरुणीने स्वतः न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडली.

तरुणीने न्यायालयात स्पष्ट केले की, ती आणि सुरेश दोघेही सज्ञान आहेत आणि एकमेकांच्या संमतीने प्रेमात होते. घरच्यांच्या दबावापोटी तिने तक्रार दाखल केली होती. तिला सुरेशसोबतच आयुष्य घालवायचे आहे, असा जबाब तिने कोर्टासमोर नोंदवला. तरुणीची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलीस आणि जेल प्रशासनाला दोघांच्या लग्नाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणची शिक्षिका रहस्यमयरित्या गायब, 4 दिवसांनी सापडला मृतदेह; पोलिसांनी असा लावला हत्येचा शोध )

तुरुंगातच सजला मंडप; पोलीस अन् वकिलांच्या उपस्थितीत सप्तपदी

न्यायालयाचे आदेश मिळताच जगदलपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर कारागृहाच्या आवारातच विवाह मंडप उभारण्यात आला. पोलीस, वकील आणि पत्रकारांच्या उपस्थितीत दोघांनी धार्मिक पद्धतीनुसार सप्तपदी पूर्ण केली.

( नक्की वाचा : Badlapur News: साडी आणून दिली नाही म्हणून डोक्यात कुकर मारून पतीला संपवलं; गुन्हा पचला होता पण... )

जगदलपूर मध्यवर्ती कारागृहाचे जेलर एस. एल. नायक यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, सुरेशने तुरुंगातूनच तरुणीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोघांचे अर्ज, संमतीपत्रे आणि कागदपत्रे तयार करून न्यायालयासमोर सादर करण्यात आली. दोघेही सज्ञान आणि परस्परांच्या संमतीने एकत्र राहण्यास तयार असल्याचे पाहून न्यायालयाने लग्नाला मंजुरी दिली. त्यानुसार कारागृह आवारात कायदेशीर पद्धतीने हा विवाह सोहळा पूर्ण करण्यात आला.
 

Advertisement

Topics mentioned in this article