Dombivli News: डोंबिवलीत खळबळ! 15 लाखांची खंडणी घेताना चार RTI कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडलं, प्रकरण काय?

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या नाले आणि गटारचे काम निकृष्ट दर्जाचे आहे, असं सांगून तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागितली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivli RTI Workers Arrested In Extortion Case

 RTI Officials Extortion Case Dombivli : डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या नाले आणि गटारचे काम निकृष्ट दर्जाचे आहे, असं सांगून तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागितली.ही खंडणी घेताना चार माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कल्याण गुन्हे शाखे पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारे इतरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळली आहे का,याचा तपास आता कल्याण गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात येत आहे.

एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्याकडे तक्रार दाखल केली

डोंबिवली पूर्व येथील एमआयडीसी परिसरात नाले आणि गटार बांधकामाचे काम मेसर्स अजवानी मेटकॉम जॉइंट व्हेंचर या कंपनीकडे देण्यात आले आहे.या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांनी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्याकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीनंतर संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून तक्रार मागे घ्यायची असल्यास 15 लाख रुपये द्यावे लागतील,अशी मागणी करण्यात आली. 

Advertisement

नक्की वाचा >> Ratnagiri News: कोकणच्या पर्यटनासाठी सरकारने उचचलं ऐतिहासिक पाऊल, विमानतळाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल 

कंपनीच्या सुपरवायझरने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर कल्याण क्राइम ब्रांच पोलिसांनी  सापळा रचला.डोंबिवली पूर्वेतील पेंढारकर कॉलेज परिसरातील एका बर्गर कॅफेमध्ये 15 लाख रुपये स्वीकारताना दीपेश लोखंडे,राहुल मुकादम,विशाल जानकर आणि नरेश सूर्यवंशी या चौघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.

नक्की वाचा >> मोठी बातमी! E-20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनधारकांचं होतंय नुकसान, केंद्र सरकारने दिली सर्वात महत्त्वाची अपडेट

या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी यापूर्वीही अशाच पद्धतीने इतरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळली आहे का,याचा तपास कल्याण गुन्हे शाखेकडून सुरू आहे.दरम्यान,आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.