भुसावळमध्ये असा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दिवसाढवळ्या चार तरूण हातात बंदूक घेत एका हॉटेलमध्ये घुसतात. तिथे चहा पित बसलेल्या एका तरुणावर ते एकामागून एक धडाधड गोळ्या झाडतात. काही मिनिटातच हा कांड होतो. त्यानंतर काही घडले नाही या आविर्भावात ते बाहेर ही पडतात. काही क्षणात दिसेनासे ही होता. त्यावेळी मात्र या हॉटेलमध्ये एकच धावपळ उडून जाते. हॉटेलमध्ये त्यावेळी बसलेले लोक क्षणात तिथून पळ काढतात. हा सर्व थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
थरकाप उडवणारी ही गोळीबाराची घटना भुसावळमध्ये घडली आहे. सकाळच्या सुमारास भुसावळच्या एका चहाच्या दुकानात काही लोक आरामात चहा पित होते. त्याच वेळी तिथं चार तरुण आले. त्यांच्या तोंडावर मास्क होते. तर हातात बंदूक होती. काहींनी ती लपवली होती. तर काही जण बंदूक घेवून दुकानात घुसताना दिसत आहे. दुकानात घुसल्यानंतर कुणाला काही समजण्याच्या आता त्यांनी धडाधड गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या गोळीबाराने दुकानातील लोक सैरावैरा पळू लागले.
दुकानामध्ये तेहरीम शेख हा तरुण चहा पित बसला होता. त्याला मारण्यासाठीच हे चार हल्लेखोर आले होते. या तरुणावर बेछूट गोळीबार करून हे हल्लेखोर फरार झाले आहेत. पुर्वीच्या दुष्मनीतून हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. गोळीबार केल्यानंतर हे हल्लोखोर दुकानाबाहेर आले. त्यांनी तिथेही हवेत गोळीबार केला. त्यातून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही सर्व कृत्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. त्यानंतर हा चारही हल्लेखोर चार बाजूला पसार झाले आहेत.
हल्ला केल्याचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हे सीसीटीव्ही पोलिस आता तपासून पाहात आहेत. यात दिसत असलेल्या चारही हल्लोखोरांना शोधण्यासाठी आता पोलिसांनी पथकं स्थापन केली आहेत. आरोपींना तातडीने पकडसे जाईल असं भूसावळ पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अंतर्गतवादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पण दिवसा झालेल्या या हत्येने भूसावळ शहर हादरले आहे.