जाहिरात

Suresh Khade: 'मी मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलो' भाजपचे माजी मंत्री असं का म्हणाले?

विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. विधानसभेत आमची मोठी संख्या आहे. विरोधक आता गल्ली इतके राहिले आहेत. असंही खाडे म्हणाले.

Suresh Khade: 'मी मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलो' भाजपचे माजी मंत्री असं का म्हणाले?
सांगली:

केरळम्हणजे मिनी पाकिस्तान आहे. त्यामुळेच तिथून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे निवडून येतात, असे वादग्रस्त विधान भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध ही करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असताना आता भाजपच्या आणखी एका नेत्याने असेच वादग्रस्त विधान केले आहे. हा नेता माजी मंत्री ही आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रातील एक मतदार संघ मिनी पाकिस्तान असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हिंदू गर्जना सभेचे आयोजन सांगलीत करण्यात आलं होतं. या सभेला मंत्री नितेश राणे उपस्थित होते. नितेश राणे यांनी आधी ही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्या वेळी वाद निर्माण झाले आहेत. कट्टर हिंदूत्ववादी अशी ते स्वत:ची प्रतिमा बनवू पाहात आहेत. त्यातूनच ते अशी वक्तव्य करत आहे. या सभेला ते उपस्थित होते. पण त्यांच्या उपस्थिती पेक्षा तिथे चर्चा होती ती माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या वक्तव्याची. नितेश राणे यांच्या  हिंदू गर्जना सभेत खाडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: पती पत्नी अन् अनैतिक संबंध! मिसेस इंडिया स्पर्धा गाजवणाऱ्या महिला डॉक्टरचे टोकाचे पाऊल

सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्यातील मिरज मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. या मतदार संघातून सलग चार वेळा त्यांनी विजय नोंदवला आहे. मात्र या मतदार संघा बाबतच त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या सभेत बोलताना ते म्हणाले. की  आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढत आहोत. याच मिनी पाकिस्तानातून आपण सलग चार वेळा निवडून आलो आहे. मिनी पाकिस्तान असतानाही आपण विजयाचा चौकार लगावला असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - : "ज्याला जायचं त्याने जा, मी कुणालाही थांबवणार नाही", उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना स्पष्टच बोलले

पुढे बोलताना ते म्हणाले की  विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. विधानसभेत आमची मोठी संख्या आहे. विरोधक आता गल्ली  इतके राहिले आहेत. शिवाय आपला देश हिंदू राष्ट्र झाले पाहिजे. त्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने  पावलं टाकली पाहीजेत. असं म्हणत यांनी पुन्हा एकदा आपल्या मतदार संघाचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला. सुरेश खाडे हे माजी मंत्री आहेत. शिवाय ते भाजपचे जेष्ठ नेते ही आहेत. त्यांच्या या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com