भावा-बहिणीने अश्लील व्हिडीओ पाहिला, त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण कुटुंब हादरलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहताना पाहिलं होतं. यावर भावाने तुझे नाव आईला सांगणार अशी धमकी दिली.

Advertisement
Read Time: 2 mins


रायगडच्या पनवेलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सख्ख्या अल्पवयीन भावा-बहिणीचे अश्लील कृत्य समोर आलं आहे. यातून बहीण गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसात भावाविरुद्ध तक्रार दाखल झाली असून खांदेश्वर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ बघताना पाहिलं होतं. यावर भावाने तुझे नाव आईला सांगणार अशी धमकी दिली होती. मात्र बहिणीने असे करू नकोस अशी विनंती त्याला केली. त्यानंतर याबदल्यात भावाने बहिणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मागील डिसेंबर महिन्यापासून हाच प्रकार सुरू होता.  

नक्की वाचा-  देश हादरवणाऱ्या 6 अपघात प्रकरणांतील आरोपींचे काय झाले?

एकेदिवशी पोटात दुखत असल्याची तक्रार मुलीने आपल्या आईकडे केली. त्यावेळी आई मुलीला उपचाराराठी रुग्णालयात घेऊन गेली. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसात अल्पवयीन भावाविरोधात तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

(नक्की वाचा - मुंबईतील एका श्रीमंत 'भिकारी'चा हत्येनं शेवट, मृत्यूपूर्वी कुटुंबाला दिलं आलिशान आयुष्य)

मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार आणि POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 376 आणि 376 (2) (ए) आणि पॉस्को कायद्यातील कलम 4, 6, 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article