मनोज सातवी
आई आपल्या मुलांसाठी काही करते. मुलं म्हणजे आईचा जीव की प्राण असतात. मुलांची प्रत्येक चुक ती आपल्या पोटात घेत असते. पण नालासोपाऱ्यातल्या आईने मुलीला तिच्या चूकीची अशी काही शिक्षा दिली की त्याने सगळेच जण हादरून गेले आहेत. आपल्या मोठ्या मुलीला ही शिक्षा देताना तिने त्यात आपल्या लहान मुलीला ही सहभागी करून घेतलं. पण शेवटी अशा काही गोष्टी समोर आल्या त्या मुळे ही आई नाही तर वैरीण ठरली. या प्रकरणाने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव फेज मधली जय विजय नगरी या इमारतीत ममता दुबे ही महिला आपल्या दोन मुली आणि पतीसह राहते. एक मुलगी 20 वर्षाची होती. तिचं नाव अस्मिता दुबे होतं. अस्मिता अविवाहीत होती. असं असतानाही ती गर्भवती होती. ही माहिती तिची आई ममताला समजली. तिला या गोष्टीता संताप झाला. तिने एक भयंकर कट रचला. तिने मुलीला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिची लहान बहीण ही आई बरोबर आली. ती 17 वर्षांची आहे. या लहान बहिणीने तिचे पाय धरले. आईने अस्मिताने दोन्ही हातावर चावा घेतला. तसेच दोरीने गळा आवळून तिची हत्या केली.
ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: मर्सिडीज वरून राजकारण सुसाट! गोऱ्हेंकडे आता थेट पावत्यांची मागणी
हत्या केल्यानंतर आई ममताने शांत डोक्याने मुलीला फासावर लटकवले. तिने आत्महत्या केली असल्याचा बनाव केला. त्यानंतर तीने पोलिस स्थानक गाठवे. ही हत्या दडपण्यासाठी अस्मिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या आईने रचला. नालासोपारा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र अस्मिताचा चेहरा सुजलेला दिसून आला. तसेच तिच्या दोन्ही हातावर चावा घेतल्याने निशाण होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला.
शवविच्छेदनाचा अहवाल त्यानंतर पोलिसांनी मिळाला. हा अहवाल पाहून पोलिसही हादरले. अस्मिताचा मृत्यू आत्महत्या नाही हे या अहवालातून स्पष्ट झाले. अस्मिताचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे त्यांनी सांगितले. अस्मिता ही गर्भवती राहिल्याचे तिच्या आईला समजल्याने ती प्रचंड संतापली होती. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी अस्मिता दुबे हिच्यावर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय तिला अटक करण्यात आली आहे. तिच्या अल्पवयीन बहिणीला देखील ताब्यात घेतले आहे.