
विधानसभेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याने सध्या राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असा गंभीर आरोप केला होता. तर गल्ला गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदेंना दिल्याचं सांगत एकच खळबळ उडवून दिल होती. त्यानंतर राज्यात मर्सिडीज वरून राजकारण सुसाट सुटलं आहे. गोऱ्हे यांना शिवसेना ठाकरे गटांनी त्यांची चांगलीच कोंडी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
निलम गोऱ्हे यांनी हे थेट आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहेत. निलम गोऱ्हे या शिवसेनेत असताना ठाकरेंच्या अगदी जवळ होत्या. त्यांचा मातोश्रीवर वावरही सतत होता. अशा वेळी त्यांनी केलेल्या आरोपांना विशेष महत्व आहे.अशी वेळी उद्धव ठाकरे यावर काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर उद्धव ठाकरे जरी जास्त बोलले नसले तरी त्यांनी मोजक्या शब्दात या आरोपांना उत्तर दिले आहे. हे सगळे गयेगुजरे लोकं आहेत. त्यांनी स्वतःचं चांगभलं करून घेतलं आहे. त्या महिला आहेत. त्यावर मी काही बोलणार नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अधिक काही बोलणं टाळलं.
संजय राऊतांनी सुनावले
उद्धव ठाकरे यांनी याबाबत अधिक बोलण्याचं टाळलं असलं तरी खासदार संजय राऊत यांनी मात्र निलम गोऱ्हे यांना चांगलचं सुनावलं आहे. निलम गोऱ्हे यांना एकदा नाही तर तब्बल चार वेळा विधान परिषदेवर संधी देण्यात आली. ही संधी त्यांना उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यांना विधान परिषदेचे उपसभापती पद ही देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी किती मर्सिडिज दिल्या? असा थेट सवाल राऊत यांनी गोऱ्हे यांना केला. तसा विचार करता त्यांनी 8 मर्सिटिड द्यायला पाहीजे होत्या. मग त्यांनी 8 मर्सिडिज दिल्या का? त्याच्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात असं खुल आव्हान ही राऊत यांनी गोऱ्हे यांना दिल्या.
ठाकरे, राऊतांनंतर अंधारेंचाही प्रहार
सुषमा अंधारे यांनी ही मग निलम गोऱ्हे यांना घेरण्याची संधी सोडली नाही. मला मोठी गंमत वाटली. मला पक्षात येऊन दोन अडीच वर्ष झालीत. नीलम गोऱ्हे त्याआधी पंचवीस तीस वर्षे होत्या. अनेक कर्तृत्ववान लोकांच्या संधी हिसकावून घेत, चार वेळा आमदारकी भोगली. 18 महिने 13 त्रिकाळ त्या मातोश्रीवरच पडीक असायच्या. मातोश्रीच्या गेटमधून कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नाही द्यायचा, आज कुणाला भेटायला वेळ मिळेल, नाही मिळेल , कुणाची नियुक्ती करायची, सभा संमेलनांना कुठे वेळ द्यायची हे ठरवणाऱ्या नीलम गोऱ्हे होत्या असं अंधारे म्हणाल्या.
ऐवढ्या पैशांचे काय केलं?
अंधारे पुढे म्हणतात, आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्या पक्षात असताना आर्थिक व्यवहार चालायचे तर स्वाभाविक आहे की नियुक्त्या, नेमणुका, निवडणुकीची तिकीट या सगळ्या प्रक्रियेत नीलम गोऱ्हे होत्या. म्हणजे हा सगळा पैसा निलम गोऱ्हेंकडे येत असणार? काय केलं असेल त्यांनी एवढ्या पैशाचं? परदेशात एखादा बँक खातं असेलच की? असा प्रश्न त्यांनी केला. आज त्या बोलल्यानंतर, अनेक लोक अगदी शिंदे किंवा भाजपाकडे गेलेले सुद्धा आवर्जून फोन करून सांगत होते, की गोऱ्हे वाहिनी कशा पद्धतीने निष्ठावान शिवसैनिकांना मातोश्रीपासून दूर ठेवण्याचे कटाक्षाने प्रयत्न केले, असा थेट आरोप अंधारे यांनी केला आहे. त्यामुळे आता या सर्वांना गोऱ्हे काय उत्तर देतात ते पहावे लागले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world