Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीने हातात चाकू घेतला, त्यानंतर घरात जे झालं ते...

भंडाऱ्याचा तुमसर शहरातील रामकृष्ण नगरात पाहुणे दांम्पत्य राहाते. भूपेंद्र पाहुणे आणि त्यांची पत्नी कुंदा पाहुणे असं या दाम्पत्याचं नाव आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
भंडारा:

महिलांवर होणारे अत्याचार आणि हल्ले याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीत. पुण्यात नुकतच एका विकृत श्रीमंताच्या पोरानं भर रस्त्यात महिलांसमोर अश्लील कृत्य केले. त्या आधी पुण्यातच एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाले. त्यानंतर रायगडमध्ये एका महिलेला तिच्या घरात घुसून मारण्यात आले. गुन्ह्यांची ही मालीका थांबण्याचं नाव घेत नाही. आता अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये घडली आहे. इथं एका पतीने थेट आपल्या पत्नीवरच हल्ला केला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनीच हा प्रकार घडला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भंडाऱ्याचा तुमसर शहरातील रामकृष्ण नगरात पाहुणे दांम्पत्य राहाते. भूपेंद्र पाहुणे आणि त्यांची पत्नी कुंदा पाहुणे असं या दाम्पत्याचं नाव आहे. पण पती नेहमी कुंदा यांच्यावर संशय घेत असे. त्यातून त्यांच्या वारंवार भांडणं ही होत असेत. कुंदा यांच्या चारित्र्यावरच त्यांनी बोट उचलले होते. या दोन्ही पती पत्नीमध्ये जवळपास दहा वर्षाचे अंतर आहे. कुंदा या 25 वर्षाच्या आहेत. तर पती भुपेंद्र हे 35 वर्षाचे आहेत.  

ट्रेंडिंग बातमी - IND VS NZ Final LIVE Score: न्यूझीलंडला पहिला धक्का, वरुण चक्रवर्तीने घेतला बळी

एकीकडे देशभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. त्याच वेळी भंडाऱ्यात मात्र एक वेगळाच प्रकार होत होता. त्या दिवशी या पती पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. वाद प्रचंड टोकाला गेला. पती ज्या वेळी घरी आला त्यावेळी कुंदा या झोपल्या होत्या. त्याने झोपेतून उठवून त्यांच्याबरोबर वाद उकरून काढला. शेवटी रागाच्या भरात भुपेंद्र याने हातात चाकू घेतला. त्यावेळी कुंदा यांना काय करावे हे समजलेच नाही. 

ट्रेंडिंग बातमी - Raj Thackeray Speech : "अंधश्रद्धेतून बाहेर या", राज ठाकरेंनी 'महाकुंभ'च्या पवित्र स्नानाची उडवली खिल्ली

तिच्या पती तिला काही समजण्याच्या आता तिच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात ती घरातच कोसळली. या हल्लायत तिच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या. यानंतर तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. सदर घटनेची नोंद तुमसर पोलिसात करण्यात आली आहे. आरोपी पती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement