IND vs NZ Final Champions Trophy 2025: भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध यांच्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताच्या या विजयानंतर देशभरात क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला.
रत्नागिरीत क्रिकेट चाहत्यांनी केला जल्लोष
चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील भारताच्या विजयानंतर रत्नागिरीतही ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. क्रिकेट प्रेमींकडून भारताच्या दणदणीत विजयानंतर जल्लोष केला जात आहे. ढोलताशांच्या गजरात केला जात आहे कोकणात विजयोत्स.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विजया बद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीट करत भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याऱ्या भारतीय संघाचा आपल्याला अभिमान आहे असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष
भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू झाला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी रस्त्यावर दिवाळी साजरी केली आहे. टी ट्वेंटी विश्वचषकानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे सर्वत्र जल्लोष होताना दिसत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये चाहते रस्त्यावर आले होते. त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा विजय
भारताने चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे. चार गडी राखून आणि एक ओव्हर शिल्लक असताना भारताने हा विजय मिळवला. भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माचा मोठा वाटा होता. त्याने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर 48 धावा आणि केएल राहुल 34 धावा करत विजयाला हातभार लावला.
भारताचे पाच फलंदाज तंबूत परतले
श्रेयस अय्यर 48 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर अक्षर पटेलही 29 धावा काढून तंबूत परतला आहे. भारताचे पाच फलंदाज बाद झाले आहेत. आता केएल राहुल आणि हार्दीक पंड्या हे मैदानावर आहेत. भारताला आणखी 45 चेंडूत 48 धावांची गरज आहे.
IND VS NZ LIVE: विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद
IND VS NZ LIVE: विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला आहे. तो पायचित झाला. दोन चेंडुत त्याला फक्त एक धाव करता आली.
IND VS NZ LIVE: दुबईत रोहित शर्माचा धमाका, टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
17 षटकांनंतर टीम इंडियाने 100 धावा केल्यात. रोहित शर्मा 57 चेंडूत 67 धावांवर खेळत आहे. आतापर्यंत हिटमनच्या बॅटमधून 7 चौकार आणि 3 षटकार लागले आहेत. शुभमन गिल 38 चेंडूत 1 षटकारासह 24 धावांवर खेळत आहे.
IND VS NZ LIVE: रोहित शर्मा- शुमभनची जोडी जमली, टीम इंडियाची शतकाकडे वाटचाल
13 षटकांनंतर टीम इंडियाचा स्कोअर एकही विकेट न गमावता 75 धावा आहे. रोहित शर्मा 47 चेंडूत 56 धावांवर खेळत आहे. आतापर्यंत हिटमनच्या बॅटमधून 6 चौकार आणि 3 षटकार लागले आहेत. शुभमन गिल 31 चेंडूत 15 धावांवर खेळत आहे/
IND VS New Zealand: रोहित शर्माकडून न्यूझीलंडची धुलाई, चौकार- षटकारांचा पाऊस
कर्णधार रोहित शर्माने फक्त 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. तो 41 चेंडूत 50 धावांवर आहे. आतापर्यंत हिटमनच्या बॅटमधून 5 चौकार आणि 3 षटकार लागले आहेत. शुभमन गिल 24 चेंडूत 10 धावांवर खेळत आहे. 11 षटकांनंतर, टीम इंडियाचा स्कोअर विकेट न गमावता 65 धावा आहे.
Rohit Sharma takes to the skies early on in the powerplay ✈️
— ICC (@ICC) March 9, 2025
Catch the Final Live in India on @StarSportsIndia.
Here are the global broadcast details: https://t.co/S0poKnxpTX#ChampionsTrophy #INDvNZ pic.twitter.com/5yiwmpr9dO
Ind Vs NZ LIVE: रोहित शर्माची तुफान फटकेबाजी, फायनलमध्ये जबरदस्त अर्थशतकी खेळी
कर्णधार रोहित शर्माने टी- ट्वेंटी स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी सुरु केली असून आपले अर्धशतकही पूर्ण केली आहे. रोहित शर्माने या खेळीमध्ये पाच चौकार आणि 3 षटकार लगावलेत.रोहितच्या या आक्रमक खेळीमुळे 10 षटकांमध्येच एकही गडी न गमावता 64 धावा केल्यात.
Ind Vs NZ LIVE: रोहित शर्माची अर्धशतकाकडे वाटचाल
कर्णधार रोहित शर्माने आक्रमक खेळी करत अर्धशतकाकडे वाटचाल सुरु केली आहे, दुसरीकडे शुभमन गिल त्याला साथ देताना दिसत आहे. रोहित शर्माच्या आक्रमक खेळीमुळे भारतीय संघाने आठ षटकात 59 धावा कुटल्या.
ind Vs NZ LIVE: टीम इंडियाची आक्रमक सुरुवात, रोहित शर्माची फटकेबाजी
3 षटकांनंतर, टीम इंडियाचा स्कोअर कोणताही विकेट न गमावता 25 धावा आहे. रोहित शर्माने 16 चेंडूत 20 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला आहे. शुभमन गिल तीन चेंडूत फक्त एका धावेवर आहे.
Ind Vs NZ LIVE Updates: रोहित शर्माची फटकेबाजी, गिलचा सावध पवित्रा
2 षटकांनंतर, टीम इंडियाचा स्कोअर कोणताही विकेट न गमावता 22 धावा आहे. दुसऱ्या षटकात रोहित शर्माने दोन चौकार मारले. हिटमनने 11 चेंडूत 18 धावा पूर्ण केल्या आहेत. शुभमन गिलचे खाते अजून उघडलेले नाही.
Ind Vs NZ LIVE: टीम इंडियाच्या फलंदाजाला सुरुवात, सलामवीर मैदानात
टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात झाली असून सलामवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा मैदानात उतरलेत. पहिल्या षटकात एकूण 9 धावा झाल्या. कर्णधार रोहित शर्माने काइल जेमिसनला षटकार मारून आपले हेतू स्पष्ट केले आहेत. न्यूझीलंडने भारताला 252 धावांचे लक्ष्य दिले आहे. हिटमन सहा चेंडूत आठ धावांवर आहे.
IND Vs NZ LIVE: टीम इंडियाची धारदार गोलंदाजी! न्यूझीलंडकडून 252 धावांचे टार्गेट
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या. मायकेल ब्रेसवेलने 40 चेंडूत 53 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार लागले. तर डॅरिल मिशेलने 101 चेंडूत 63 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले. त्याचबरोबर रचिंद्र रविनने 37 धावा केल्या.
Ind Vs NZ LIVE Updates: वरुण चक्रवर्तीने आणखी एक मोहरा टिपला, किवींची फिरकीपुढे दाणादाण
टीम इंडियाच्या फिरकीपुढे किवींना मोठा संघर्ष करायला लागत असल्याचे चित्र दिसत आहे. डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यातील भागीदारी तुटली आहे. वरुण चक्रवर्तीने फिलिप्सला बाद केले. तो 52 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. 28 व्या षटकात न्यूझीलंडने 165 धावांवर पाचवी विकेट गमावली.
IND Vs NZ LIVE: न्यूझीलंडला पाचवा धक्का, निम्मा संघ तंबूत
भारतीय संघाला आणखी एक महत्त्वाची विकेट मिळवली आहे. वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवत ग्लेन फिलिप्सला आऊट केले. फिलिप्स 34 धावा करुन आऊट झाला.
Glenn Phillips gets a reprieve as New Zealand eye a strong finish with six wickets in hand 👊#ChampionsTrophy #INDvNZ 📝: https://t.co/SGA6TKTWRp pic.twitter.com/hJed2i4muR
— ICC (@ICC) March 9, 2025
ind Vs NZ LIVE Update: सामन्याची 32 षटके पूर्ण, धावसंख्या 4 बाद 143
32 षटकांनंतर, न्यूझीलंडचा स्कोअर 4 बाद 143 धावा आहे. डॅरिल मिशेल 64 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 34 धावांवर खेळत आहे. ग्लेन फिलिप्स 32 चेंडूत 22 धावांवर खेळत आहे. त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला आहे. दोघांमध्ये 42 चेंडूत 35 धावांची भागीदारी झाली आहे.
Ind Vs NZ LIVE: न्यूझीलंडच्या धावसंख्येला ब्रेक, 4 बाद 126 धावा
28 षटकांनंतर, न्यूझीलंडचा स्कोअर 4 बाद 126 धावा आहे. डॅरिल मिशेल 53 चेंडूत एका चौकारासह 28 धावांवर खेळत आहे. ग्लेन फिलिप्स 19 चेंडूत 12 धावांवर खेळत आहेत. त्याने एक षटकार मारला आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध किवी फलंदाज संघर्ष करत आहेत.
ind Vs NZ: किवींचा धावांसाठी संघर्ष, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी रोखले
26 षटकांनंतर न्यूझीलंडचा स्कोअर 4 बाद 116 धावा आहे. डॅरिल मिशेल 50 चेंडूत 1 चौकारासह 26 धावांवर खेळत आहे. ग्लेन फिलिप्स 10 चेंडूत चार धावा काढत आहेत. भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध किवी फलंदाज संघर्ष करत आहेत.
ind Vs NZ LIVE: न्यूझीलंडला आणखी एक धक्का
24 व्या षटकात न्यूझीलंडने 108 धावांवर चौथी विकेट गमावली. रवींद्र जडेजाने टॉम लॅथमला एलबीडब्ल्यू बाद केले. तो 30 चेंडूत 14 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
Ind Vs NZ LIVE: न्यूझीलंडच्या संघाला चौथा धक्का, रविंद्रने मोठा खेळाडू टिपला
रविंद्र जडेजाने न्यूझीलंडच्या संघाला चौथा मोठा धक्का दिला आहे. न्यूझीलंडचा फलंदाज टॉम लॅथमला रविंद्रने पायचीत केले.
Ravindra Jadeja picks up his first wicket as Tom Latham is given out LBW!
— BCCI (@BCCI) March 9, 2025
Live - https://t.co/OlunXdyTfP #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/6gWZ07L7cG
IND VS NZ LIVE: न्यूझीलंड संघाचे शतक पूर्ण, तीन मोठे धक्के
20 षटकांनंतर, न्यूझीलंडचा स्कोअर ३ बाद 100 आहे. डॅरिल मिशेल 29 चेंडूत एका चौकारासह 13 धावांवर खेळत आहे. टॉम लॅथम सात चेंडूत पाच धावांवर खेळत आहे. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीच्या फिरकीने न्यूझीलंडच्या संघाची दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
ind Vs NZ LIVE: टीम इंडियाच्या फिरकीची जादू, न्यूझीलंडचा संघ फसला
न्यूझीलंडच्या धावांचा वेग कमी झाला आहे. शेवटच्या पाच षटकांत फक्त 14 धावा झाल्या आहेत आणि 2 विकेटही पडल्या आहेत. भारत चौथ्या विकेटसाठी प्रयत्नशील असताना डॅरिल मिशेल आणि टॉम लॅथमची जोडी येथून पुढे भागीदारी रचण्याचा प्रयत्न करेल. आज फिरकीपटूंनी त्यांचे काम केले आहे.
ind vs NZ LIVE: रोहित शर्माची उत्तम कॅप्टनसी, गोलंदाजांनी किवींना रोखले
रोहित शर्मा त्याच्या गोलंदाजांचा योग्य वापर करत आहे. आतापर्यंत किवी संघाच्या तीन विकेट पडल्या आहेत. लॅथम आणि मिशेल क्रीजवर आहेत. न्यूझीलंड संघ दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे. रोहित शर्माची कर्णधारपदाची धुरा उत्तम दिसत आहे.
india Vs New Zeland: कुलदीप यादव चमकला, न्यूझीलंडला तिसरा धक्का
कुलदीप यादवने चमत्कार केला आहे. त्याने पहिल्या षटकात रॅचिनला आणि दुसऱ्या षटकात केन विल्यमसनला बाद केले. सर्वांच्या नजरा केन विल्यमसनवर होत्या. कुलदीपने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला आहे. त्याने फक्त 11 धावा काढता आल्या. यासोबतच न्यूझीलंडच्या 16 षटकांमध्ये 86 धावा झाल्या असून तीन विकेट्स गमावल्यात.
Oh Yes!! 🔥🔥
— BCCI (@BCCI) March 9, 2025
Kuldeep Yadav comes into the attack and strikes straight up!
Rachin Ravindra is bowled for 37 runs.
Live - https://t.co/OlunXdzr5n #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/OnVggoG8h0
ind vs NZ LIVE: कुलदीप यादवचा जलवा, रचिन रविंद्रची विकेट
कुलदीप यादवने येताच भारताला यश मिळवून दिले आहे. पहिलाच षटक टाकायला आला, पहिलाच चेंडू आणि सर्वात मोठी विकेट. रचिन रवींद्र पॅव्हेलियन येथे. तो एक गुगली बॉल होता. तो पाचव्या स्टंपवरून आला. रचिनला धक्का बसला. कसे तरी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण खूप उशीर झाला होता. चेंडू फलंदाजाला मारत विकेटला जाऊन लागला. भारतीय संघाला मोठे यश मिळाले आहे. २९ चेंडूत ३७ धावा करून रचिन बाद झाला.
IND vs NZ LIVE: न्यूझीलंडला दुसरा धक्का, कुलदीपने काढला रचिन रविंद्रचा काटा
वरुण चक्रवर्तीने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. वरुणने विल यंगला स्वस्तात आऊट केले, त्यानंतर कुलदीप यादवने रचिन रविंद्रचा काटा काढला. विल यंगने 15 धावा केल्या तर रचिन रविंद्रने 37 धावा केल्या.
ind Vs NZ: न्यूझीलंडला पहिला धक्का, वरुण चक्रवर्तीने घेतला बळी
न्यूझीलंडच्या आक्रमक खेळीला भारतीय संघाने ब्रेक लावला आहे. न्यूझीलंडला वरुण चक्रवर्तीने पहिला धक्का दिला असून विल यंग आऊट झाला. त्याआधी त्याला दोन जिवदानही मिळाले.
Ind Vs NZ LIVE: न्यूझीलंडची आक्रमक सुरुवात, 50 धावा पूर्ण
पाच ओव्हर पूर्ण झाल्या असून न्यूझीलंडच्या संघाने आक्रमक खेळी सुरु केली आहे. वरुण चक्रवर्ती आता गोलंदाजीला उतरला असून न्यूझीलंडने सहा षटकात 47 धावा कुटल्या आहेत.
india Vs New Zealand Final: रचिन रविंद्रची जोरदार फटकेबाजी, हार्दिक पांड्याची धुलाई
न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रविंद्रने जोरदार फटकेबाजी सुरु केली आहे. रचिनने हार्दिक पांड्याच्या ओव्हरमध्ये एक सिक्स आणि दोन चौकार ठोकत 16 धावा कुटल्या.
Ind Vs NZ LIVE Score: फायलनचा थरार सुरु! न्यूझीलंडची सावध सुरुवात
पहिले षटक पूर्ण झाले. भारताकडून गोलंदाजीची सुरुवात मोहम्मद शमीने केली. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला गेला आहे. हा डावातील पहिला चौकार आहे. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॅकवर्ड पॉइंटकडे जाताना शानदार ड्राइव्ह. दुसऱ्या ओव्हारमध्ये हार्दिक पांड्या आहे. हार्दिकने या षटकात फक्त दोन धावा दिल्या आहेत. पहिले दोन षटके शानदार होती. न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर सावध फलंदाजी करत आहेत.
Ind Vs NZ LIVE Score: न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात, सलामीची जोडी मैदानात
न्यूझीलंडची फलंदाजी सुरू झाली आहे. विल यंग आणि रचिन रवींद्र ही सलामीची जोडी क्रीजवर आहे. भारत शक्य तितक्या लवकर विकेट मिळविण्याचा प्रयत्न करेल.
ICC Champions Trophy 2025: जिंकणारी टीम होणार मालामाल; किती मिळणार बक्षीस?
जर टीम इंडिया चॅम्पियन झाली तर त्यांना 2.24 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 19.49 कोटी रुपये) मिळतील. त्याच वेळी, अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला1.12 दशलक्ष डॉलर्स (9.74 कोटी रुपये) मिळतील. याचा अर्थ असा की जर भारत जिंकला तर त्यांना गट टप्प्यातील सामन्यांमधील पैशांसह 21. 4 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, जर भारत हरला तर त्याला सुमारे 1.34 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 11.6 कोटी रुपये) मिळतील. अर्थात, जेव्हा बक्षिसाची रक्कम इतकी मोठी असेल तेव्हा स्पर्धा खूप कठीण होणार आहे. बघूया कोणाला सुमारे 20 कोटी रुपये मिळतात आणि कोणाला त्याची निम्मी रक्कम मि
india Vs New Zealand Final: शुभमन गिल शतक झळकावणार: मायकल क्लार्कचे भाकित
शुभमन गिल अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल आणि अंतिम सामन्यात शतक झळकावण्यात यशस्वी होईल. मला वाटते की गिल अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल आणि शतक करेल. जर न्यूझीलंडला भारताविरुद्ध जिंकायचे असेल तर केन विल्यमसनला शतक करावे लागेल जेणेकरून तो इतर फलंदाजांना मोकळेपणाने खेळू शकेल. त्याच वेळी, क्लार्कने भाकीत केले आहे की या सामन्यात फिरकीपटू आपली प्रतिभा दाखवू शकतात. क्लार्कच्या मते, मिचेल सँटनर हा किवी संघाकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असेल.: मायकेल क्लार्क
india Vs NZ Final LIVE: भारत की न्यूझीलंड? कोण जिंकणार..: ए बी डिव्हिलियर्सची प्रतिक्रिया
गेल्या सामन्यात भारताने किवी संघालाही हरवले आहे. पण न्यूझीलंड संघ खूप मजबूत आहे, हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. पण मी भारताला फेव्हरिट मानतो. मला हा एक हाय स्कोअरिंग सामना हवा आहे. एबीने कबूल केले आहे की दोन्ही संघांमध्ये माझे मित्र आहेत आणि म्हणूनच मी दोन्ही संघांच्या खेळाडूंना शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया एबी डिव्हिलियर्सने दिली आहे.
ind Vs NZ LIVE: नाणेफेक न्यूझीलंडने जिंकली, प्रथम फलंदाजी करणार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना होत आहे. फायनलच्या लढतीसाठी टीम इंडिया सज्ज झालीये मात्र नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा रोहित शर्माच्या विरोधात लागला आहे. न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Two teams eager to etch their name in the history books. Who's winning the #ChampionsTrophy? 🏆
— ICC (@ICC) March 9, 2025
Details 👉 https://t.co/NHbnqbFDpt pic.twitter.com/PTJhe9a5JA
ind Vs NZ Final LIVE: फायनलच्या थराराला सुरुवात, पाहा दोन्ही संघाची प्लेईं 11
भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंडचा संघ: विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क, नाथन स्मिथ
A look at #TeamIndia's Playing XI for the #Final 🔽
— BCCI (@BCCI) March 9, 2025
Updates ▶️ https://t.co/uCIvPtzZQH#ChampionsTrophy | #INDvNZ pic.twitter.com/W1CY7MiCBH