Crime News: सासऱ्याचा गळा कापला, सासूलाही ठार केलं, पत्नी समोरच थरकाप उडवणारा डबल मर्डर

आशा देवी ज्यावेळी जगदीपला अडवण्यासाठी गेल्या त्यावेळी त्याने त्यांना ही चाकूने भोसकलं. हे सर्व पूनमच्या डोळ्या समोर होत होते.

जाहिरात
Read Time: 3 mins

लखनऊमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका पतीने आपल्या पत्नीच्या आई-वडिलांची घरात घुसून निर्घृण हत्या केली आहे. बुधवारी रात्री ही थरकार उडवणारी घडना घडली. पूनमही नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आपल्या माहेरी म्हणजेच लखनौला आली होती. तिच्या घरी आई वडील आणि ती राहात होती. पण तिचा पती जगदीप याला ते पटलं नव्हतं. तो पत्नीला आणण्यासाठी म्हणून तिच्या घरी गेला होता. पण त्याच वेळी त्यांनी कुणीही विचार केला नसेल असा कांड केला. त्याने घरात घुसून सासू आणि सासऱ्याची अंत्यत क्रुरपणे हत्या केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पूनमसाठी बुधवारची रात्र अत्यंत कठीण ठरली. कारण तिच्या डोळ्या समोर तिच्या आई-वडिलांचा खून करण्यात आला. हा खून दुसऱ्या तिसऱ्या कुणी केली नाही तर तिच्या पतीनेच हा खून केला. पूनमचे जगदीप बरोबर लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाला जवळपास 10 वर्षे झाली होती. पण जगदीपच्या चुकीच्या सवयी आणि अय्याशीमुळे पूनम त्रस्त झाली होती. त्याच्या जाचाला कंटाळून ती त्याला सोडून आपल्या माहेरी आली होती. ती आपल्या आई वडीलां बरोबरच राहात होती. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Double Murder: मालकीण रागावली म्हणून संतापलेल्या नोकारनं केली माय-लेकराची गळे चिरुन हत्या!

पत्नी माहेरी निघून गेल्याचा राग जगदीपच्या मनात होता. त्या रागातून तो तीला परत आणण्यासाठी गेला. त्यावेळी पूनमचे वडील अनंतराम घरी होती. ते आरपीएफमधून निवृत्त झाले आहेत. जगदीपने आपण पूनमला घेवून जाण्यासाठी आलो आहे असं सांगितलं. पण गेल्या 10 वर्षा पासून तू पुनमला त्रास देत आहेस तिचा छळ करत आहेस. त्यामुळे तिला तुझ्या बरोबर मी पाठवणार नाही. हे ऐकून जगदीपला संताप अनावर झाला. तो  चिडला आणि त्याने सोबत आणलेल्या चाकूने अनंतराम यांचा गळा चिरला.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Akola News : सावत्र बापाने घेतला 9 वर्षीय मुलाचा जीव; संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय

यावेळी पूनमची आई आशा देवी त्यांच्या पतीला वाचवण्यासाठी धावली. जगदीप त्यांच्या गळ्यावर वार करत होता. त्याने केलेला हल्ला इतका जबर  होता की अनंतराम यांना आवाज काढण्याची ही संधी मिळाली नाही. आशा देवी ज्यावेळी जगदीपला अडवण्यासाठी गेल्या त्यावेळी त्याने त्यांना ही चाकूने भोसकलं. हे सर्व पूनमच्या डोळ्या समोर होत होते. यावेळी हे सर्व पाहून पूनमने आरडाओरडा केला. त्यानंतर त्यांच्या शेजारी असलेल्या धर्मशिला देवी धावत आल्या. त्यावेळी त्यांनी जगदीपला पळून जाताना पाहिलं. त्यावेळी जगदीपने त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण त्या बचावल्या. त्यांच्या आवाजाने परिसरातील लोक जमा झाले आणि त्यांनी जगदीपला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 1 पोलिस कर्मचारी, 18 महिला, 18 खून अन् अंगावर काटा आणणारी 129 मिनिटांची सत्य कथा

जगदीपविरुद्ध पूनमने महिला आयोगात तक्रार केली होती. त्यामुळे तो आधीच चिडलेला होता. त्यामुळे त्याने या रागाच्या भरात हे दुहेरी हत्याकांड केले. त्यानंतर या परिसरात खळबळ उडाली आहे. पूनम या घटनेनंतर खचून गेली आहे. तिची प्रकृती बिघडली आहे. पूनमची वहिनी मोनिकाने सांगितलं की जगदीपने पूनमसोबत 2016 मध्ये लग्न केल्यापासून तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेकदा तिला फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली होती. काही काळापूर्वी त्याने व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली पूनम कडून पैसे घेतले होते. पण त्याने अय्याशीमध्ये ते उधळले. जेव्हा पूनमला हे समजलं आणि तिने विरोध केला, तेव्हा जगदीपने तिच्याशी भांडायला सुरुवात केली. एप्रिलमध्ये या भांडणाला कंटाळून पूनम माहेरी आली होती.