Crime news: प्रेयसीचे धडापासून शीर वेगळं केलं, हातात कोयता घेऊन 4 किमीचे अंतर कापलं अन् पुढे...

19 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास सोनाली ही तीचा प्रियकर सखाराम याला भेटण्यासाठी पुण्यातून नगर येथे पोहोचली.

जाहिरात
Read Time: 3 mins
अहिल्यानगर:

त्याचं वय 53 वर्ष. तिचं वय 28 वर्ष. तिचं लग्न झालं होतं. पण तरी ही नवऱ्याला सोडून ती प्रियकराबरोबर राहत होती. काही काळ दोघे ही एकत्र होते. पण परत ती नवऱ्याकडे गेली. मात्र संसारात तिचं मन रमत नव्हतं. तिला परत प्रियकराकडे यायचं होतं. ती त्याला भेटायला ही आली. पण त्याच वेळी काही तरी बिनसलं. प्रियकराने तिचं थेट शीरचं कापलं. त्यानंतर ज्या कोयत्याने शीर कापलं तो कोयता घेवून तो चार किलोमीटर चालत स्वत: पोलिसांसमोर गेला. तिथे त्याने हत्येची कबुली दिली. मात्र हत्या करण्या मागचं कारणं ऐकून पोलिस ही हादरुन गेले. ही खळबळजनक घटना शिर्डी जवळील राहुरीत घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सखाराम धोंडीबा वालकोळी हा पुणे जिल्ह्यातल्या निरगुडसर इथला रहिवाशी आहे. त्याचं वय 53 वर्ष आहे. त्याचं सोनाली राजु जाधव या तरुणी बरोबर प्रेमसंबध होते. तिचं वय 28 वर्ष होतं. ती पुणे जिल्ह्यातल्या पोखरी गावची राहाणारी होती. तिचं लग्न झालं होतं. तरी ही ती सखाराम याच्या बरोबर लिव्ह इन मध्ये राहात होती. त्यांचे अनैतिक संबध होते. पण काही दिवसांपूर्वीच ती सखाराम याला सोडून आपल्या पतीकडे गेली होती. पण तिने परत सखारामकडे येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ती पुण्यातून प्रियकर असलेल्या सखारामला भेटण्यासाठी आली.  

ट्रेंडिंग बातमी - DCM एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे कोण? का दिली धमकी?

19 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास सोनाली ही तीचा प्रियकर सखाराम याला भेटण्यासाठी पुण्यातून नगर येथे पोहोचली. ते दोघे ही नगर बस स्थानकावर भेटले. त्यानंतर सखाराम हा सोनाली हिला घेऊन राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदीरा शेजारच्या डोंगराजवळ गेला. संध्याकाळी साडेसात वाजता, त्या दोघांनी तेथे बसून गप्पा ही मारल्या. मात्र पुढे दोघांमध्ये वाद झाला. मला तूझ्याकडे यायचे आहे. मला पैसे दे. मी ज्याच्या सोबत गेले होते, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. तसेच तु मला नाही सांभाळले तर मी तुला सोडणार नाही. तुझ्या विरुध्द ही गुन्हा दाखल करेल,अशी धमकी देत होती. 

ट्रेंडिंग बातमी - Crime News: रात्रभर बेदम मारहाण, पैशांची मागणी; प्रेमप्रकरणातून तरुणाला हाल-हाल करुन मारलं, पुढे जे घडलं...

सखाराम तीच्या वारंवार दिल्या जाणाऱ्या धमकीला वैतागला होता. त्याचा त्यावेळी संताप झाला. त्याने मागेपुढे कसलाही विचार न करता लाकडी दांडा आणि दगडाने तिला मारहाण केली. त्यानंतर त्याने कोयत्याने सोनालीवर वार केला. वार इतका जोरात होता की तीचे शिर धडापासुन वेगळे झाले. तिची त्याने हत्या केली. त्यानंतर आरोपी सखाराम हा स्वतः चार किलोमीटर चालत गेला. तिथे वांबोरी येथील पोलिस स्टेशन आहे. त्यावेळी त्याने ज्या कोयत्याने तिची हत्या केली तो कोयता घेवून तो पोलिस चौकीत हजर झाला. शिवाय आपण सोनालीचा खुन केला आहे, याची कबूली त्याने दिली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Saffron farming: संत्र्यांच्या नागपुरात चार भिंतीत आता केसर शेती, हा करिश्मा कसा झाला?

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार वाल्मीक पारधी, सुनिल निकम, आजिनाथ पालवे, अंकुश भोसले  यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सोनाली राजू जाधव हिचे धड व धडापासुन वेगळे झालेले शिर ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.