जाहिरात

DCM एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे कोण? का दिली धमकी?

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी शुक्रवारी मुंबईतील काही पोलीस ठाण्यांना मिळाली होती. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

DCM एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे कोण? का दिली धमकी?

प्रविण मुधोळकर, नागपूर

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. या प्रकरणी मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले दोघेही नात्याने ‘आतेभाऊ-मामभाऊ' आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी शुक्रवारी मुंबईतील काही पोलीस ठाण्यांना मिळाली होती. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(नक्की वाचा-  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाला मारहाण; गज्या मारणे टोळीतील तिघांना अटक)

Mumbai Crime News

Mumbai Crime News

या प्रकरणी पोलिसांनी देऊळगावच्या मंगेश अच्युतराव वायाळ आणि अभय गजानन शिंगे या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मंगेश हा ट्रक चालक असून, अभयचे मोबाईल शॉप असल्याची माहिती समोर आली आहे. 

(नक्की वाचा- आमदार निवासातील घरांवरुन आमदारांमध्ये जुंपली; अनेक मंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर)

धमकी देण्याचं कारण काय?

प्राथमिक तपासानुसार, या दोघांनी आपसातील वादातून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या संदर्भात अलर्ट देण्यात आला होता. एकनाथ शिंदे आज नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरच्या देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी देखील चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: