प्रियकराबरोबर संसार करण्यासाठी एका विवाहीत महिलेने टोकाचं पाऊल उचललं. ती महाराष्ट्रातल्या पालघरमध्ये राहात होती. तर तिचा प्रियकर बिहारमध्ये राहात होता. पण तिला त्याच्या जवळ राहायचे होते. त्यासाठी ती संधी शोधत होती. त्याच्या पर्यंत कसे पोहोचता येईल याचा विचार ती करत होती. शिवाय तो आपल्याबरोबर लग्न कसं करेल याचाही विचार तिच्या डोक्यात सुरू होता. त्यातून तिने एक भयंकर कट रचला. ज्यावेळी त्या मागचे सत्य समोर आले त्यावेळी सर्वांच्याच पाया खालची वाळू सरकली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पालघरमध्ये वसई जवळच्या मांडवी इथं ही महिला राहाते. तिला तिच्या प्रियकराबरोबर नवन जिवन सुरू करायचे होते. त्यासाठी तिने आपल्या भावाच्या तीन महिन्याच्या मुलाचा वापर करुन घेण्याचा ठरवले. या तीन महिन्याच्या बाळाला तिने (Maharashtra Child Kidnapping) किडनॅप केले. हा मुलगा आपला असल्याचा दिखावा तिला करायचा होता. शिवा तो प्रियकरापासून झाला आहे, असं तिनेनंतर प्रियकरालाही सांगितलं होतं. त्या मुलाला घेवून ती थेट बिहारमधील नालंदामध्ये पोहोचली. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस ही तिच्या मागावर बिहारमध्ये पोहोचले.
मुलगा गायब झाल्याने त्याच्या पालकांनी मांडवी पोलिस स्थानकात याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध ही सुरू केला. त्यानुसार मांडवी पोलिस स्थानकाचे निरिक्षक संजय हजारे यांनी या प्रकरणाची पूर्ण माहिती दिली. 18 फेब्रुवारीला ती महिला आपल्या भावाच्या मांडवी इथल्या घरी गेली. त्यावेळी त्या लहान बाळाला फिरवून आणते असं तिने घरी सांगितलं. त्यानंतर ती तिथून फरार झाली. त्यानंतर अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती.
ट्रेंडिंग बातमी - Akshay Kumar : सातत्याने फ्लॉप चित्रपटांदरम्यान अक्षयने विकली मुंबईतील तीन घरं
त्यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरू केला. गुप्तहेरांकडून ती बिहारमधील नालंदामध्ये गेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक पोलिसांची पालघर पोलिसांनी मदत घेतली. त्यानंतर बिहार झारखंडच्या सीमेवर मीरनगर जवळ सूर्यचक हे गाव आहे. या गावात ती लपून बसली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्या गावात पोलिसंनी काही घरात छापेमारी केली. त्यातील एका घरात संबधीत महिला दिसून आली. तिच्या बरोबर ते बाळ ही होते.
त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ही महिला विवाहीत होती. तिला तीन मुलंही होती. पण तिने ही बाब आपल्या प्रियकरापासून लपवली होती. तिला बिहारमध्ये असलेल्या आपल्या प्रियकराबरोबर नवी सुरूवात करायची होती. त्यामुळेच तिने आपण अविवाहीत आहोता. शिवाय आपण गर्भवती असल्याचं प्रियकराला सांगितलं होतं. त्यातूनच तिने भावाच्या मुलाचे अपहरण केले. शिवाय हे बाळ आपल्या दोघांचे आहे हे तिने आपल्या प्रियकराला सांगितले. मात्र तिला पकडल्यानंतर तिचा पर्दाफाश झाला आहे.