
स्वानंद पाटील, बीड
संतोष देशमुख हत्या प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आला. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचं आरोपपत्रातून समोर आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर बीडमधील सर्वपक्षीय राजकारणी एकवटले आणि धनंजय मुंडेविरोधात उभे राहिले होते. याचाच फटका धनंजय मुंडेना बसला. मात्र राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची टीम DM अॅक्टिव्ह झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक झालेल्या बीडमधील राजकारण्याच्या निकटवर्तीयांचे व्हिडीओ आता समोर येऊ लागले आहे. आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यानंतर आता माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा आणखी एक व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुशील सोळंके माजलगावच्या तहसीलदारांना शिवीगाळ करून दमदाटी करत आहे. शिवाय पोलीस यंत्रणेवर देखील यावेळी दबाव टाकताना सुशील सोळंके दिसत आहे.
(नक्की वाचा- Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट)
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पाणी टंचाईच्या अनुषंगाने माजलगावच्या तत्कालीन तहसीलदार वर्षा मनाळे गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या. त्याच वेळी प्रकाश सोळंके यांचा निकटवर्तीय सुशील सोळंके त्या ठिकाणी ग्रामस्थांसह पोहोचला. त्याने अधिकारी कर्मचाऱ्यांवर दमदाटी केली.
(नक्की वाचा- Satish Bhosle News : खोक्याभोवती कारवाईचा फास आवळला; बीड पोलिसांची मोठी कारवाई)
सुशील सोळंके यांनी प्रकाश सोळंके यांना तेथून फोन देखील केला. सदरील व्हिडिओ 10 एप्रिल 2024 चा असून सध्या सोशल माध्यमातून व्हायरल होतो आहे. एका मल्टी सर्विसेस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी सुशील सोळंकेवर गुन्हा दाखल असताना देखील त्याला पोलिसांनी अटक केलेली नाही. मल्टी सर्विसेस चालकाला मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता प्रशासनावर दमदाटी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world