मनोज सातवी
मॅट्रिमोनिअल साईटवर आपण दिल्ली क्राइम ब्रांचचा सायबर सिक्युरिटी ऑफिसर असल्याचं तो तरुणींना सांगायचा. विशेष म्हणजे या सर्व तरुणी या उच्चभ्रू असायच्या. अशी बतावणी करुन तो त्यांना आपल्या जाळ्यात ओढयचा. सुरुवातील त्यांना महागड्या भेटवस्तू ही तो देत असे. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. शरिराची भूक भागल्यानंतर त्यांची तो आर्थिक फसवणूक ही करत होता. अशा जवळपास 12 तरुणींना त्याने फसवले. अशा या लखोबा लोखंडेला वालीव पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. हिमांशू योगेशभाई पांचाळ असे या 26 वर्षीय आरोपीचे नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रभाकर पणशीकरांनी साकारकेल्या 'तो मी नव्हेच' या नाटकातील लखोबा लोखंडे या पात्रा प्रमाणे हिमांशू पांचाळ हा भामट्याने अतिशय सराईतपणे हाय प्रोफाईल तरुणींना फसवलं आहे. लग्न जुळविण्यासाठी असलेल्या shadi.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून तो या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायचा. हिमांशू पांचाळ हा अहमदाबाद मधील जनकपूर येथील रहिवाशी आहे. त्याने shadi.com वर आपले बनावट प्रोफाईल बनवले आहे. त्यात त्याने आपण दिल्ली क्राइम ब्रांचचा सायबर सिक्युरिटी ऑफिसर असल्याचे असल्याचे म्हटले आहे.
आपण खानदानी श्रीमंत असल्याचं तो या तरुणांना सांगायचा. शिवाय भरपूर पगार आणि संपत्ती असल्याची माहिती त्याने संकेत स्थळावर दिली होती. बोलण्यात पटाईत असलेला हिमांशू हा मॅट्रिमोनिअल साइटवरून अनेक तरुणींना संपर्क करायचा. वेगवेगळ्या भूलथापा देऊन तरुणींना वसई किंवा मुंबईतील वेगवेगळ्या परिसरातील हॉटेल किंवा लॉज मध्ये बोलवायचा. फराटेदार इंग्रजी बोलून तो मुलींना इम्प्रेस करायचा. तो महागडे मोबाईल फोन वापरायचा. शिवाय त्याच्याकडे ॲपलचा लॅपटॉप ही होता.
या माध्यमातून तो मुलींवर प्रभाव पाडायचा. त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवायचा. पहिल्याच भेटीत मुलींना तो नकली हिऱ्यांचे किंवा इतर दागिने भेट ही देत होता. त्यानंतर त्या तरुणींना तो शरिरसंबंध ठेवण्यााठी भाग पाडायचा. हे सर्व आता तपासात निष्पन्न झाले आहे. त्या नंतर वेगवेगळी कारण सांगून त्या मुलींकडून पैसे उकळून फरार होत असे. या महाभागाने आतापर्यंत 12 पेक्षा जास्त तरुणींची फसवून केली आहे. शिवाय त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची आर्थिक फसवणूक ही केली आहे. मिरा रोड येथील एका तरुणीला ही त्याने अशाच पद्धतीने जाळ्यात ओढले होते. तिच्याबरोबर त्याने शरिरसंबध ही ठेवले. पणनंतर फसवणूक झाल्याचे तरुणीला लक्षात आले.
ट्रेंडिंग बातमी - EVM च्या मुद्यावर ठाकरेंमध्ये मतभेद, राज ठाकरेंच्या भूमिकेला मुलगा अमितकडूनच छेद
तिने वसईतल्या वालीव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.वालीव पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक गोरखनाद जैद, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, विश्वासराव बाबर , किरण म्हात्रे, सचिन दोरकर, पांडुरंग कुडू, बाळू कुटे यांच्या पथकाने तांत्रिक तपसाच्या आधारे अहमदाबाद मध्ये जाऊन आरोपी हिमांशू पांचाळ याला अटक केली. मात्र पोलिसांच्या तपासात उघड झालेल्या माहितीमुळे, आणि त्याच्या कारणामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.