एक 25 वर्षाच्या तरुणीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना उत्तर प्रदेशातल्या इटावा इथ घडली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय त्या तरुणीच्या कुटुंबीयांनाही यामुळे मोठा धक्का बसला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. शिवाय हत्या कोणत्या कारणासाठी केली याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंजली नावाची तरुणी इटावा इथ राहाते. ती 25 वर्षाची होती. तिला जमिन खरेदी करायची होती. त्यासाठी तिने एका प्रॉपर्टी डिलरला सहा लाख रुपयेही दिले होते. पण तिला पैसे देवून ही जमिन दिली जात नव्हती. एक दिवसी त्या डिलरने तिला कागदपत्र द्यायची आहेत असं सांगत बोलवून घेतलं. कागदपत्र घेण्यासाठी ती घरून निघाली. तसं तिने घरी सांगितलं ही होतं. आपली दुचाकी घेवून ती त्या प्रॉपर्टी डिलरकडे गेली.
शिवेंद्र यादव (26) आणि त्याचा सहकारी गौरव (19) हे अंजलीची वाट पाहात होते. ती आल्यानंतर त्यांनी तिला जबरदस्ती दारू पाजली. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यांतर तिचा गळा आवळून तिचा खून केला. ती मेली आहे याची खात्री केल्यानंतर या दोघांनी ही तिचा मृतदेह जाळून टाकला. मृतदेह पूर्ण जळला नाही. त्यामुळे त्यांनी तो एका नदीत फेकून दिला. पाच दिवसानंतर नदी पात्रात अंजलीचा मृतदेह आढळून आला.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी अंजलीची हत्या केल्यानंतर व्हिडीओ कॉल केला होता. हा व्हिडीओ कॉल त्यांनी त्यांच्याच वडील आणि पत्नीला केला होता. त्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अंजलीचा मृतदेह दाखवला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. त्याच वेळी अंजलीच्या कुटुंबीयांना तिची जळलेली स्कुटर मिळाली. त्यानंतर ही हत्या जमिनीच्या व्यवहारातून झाल्याचा आरोप त्यांनी केला.
अंजलीची बहीण किरण हिने सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितलं. अंजली जमिन खरेदी करणार होती. त्यासाठी तिने प्रॉपर्टी डिलरला सहा लाख रुपये दिले होते. त्यानंतर जमिनीचे कागदपत्र देण्यासाठी त्यांनी अंजलीला बोलावले होते असं तिने पोलिसांना सांगितलं. त्यानंतरच हत्या केली गेली असा आरोप तिने केला. यानंतर शिवेंद्र यादव आणि त्याचा सहकारी गौरव याला अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.