जाहिरात

CIDCO News: गरीबांचे घर, श्रीमंतांचे दर ! सिडकोच्या वाढीव दरांविरोधात मनसेनं आता काय केलं पाहा

सिडकोच्या 26,000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यासाठी 21,399 जण लॉटरीसाठी पात्र ठरले होते. त्या पैकी जवळपास 19 हजार 518 जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे.

CIDCO News: गरीबांचे घर, श्रीमंतांचे दर ! सिडकोच्या वाढीव दरांविरोधात मनसेनं आता काय केलं पाहा
नवी मुंबई:

प्रथमेश गडकरी

सर्व सामान्यांना परवडणारी घरं म्हणून सिडकोने योजना आणली. माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर झाली. 26,000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. पसंतीची घरंही देण्यात आली. पण घरांच्या किंमती पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. ही सर्व सामान्यांची की श्रीमंतांची घरं असा प्रश्न लॉटरीतील विजेत्यांनी उपस्थित केले. घराच्या किंमती 40 लाखांपासून 1 कोटीपर्यंत होती. त्यामुळे लॉटरीत घर लागूनही अनेकांनी ती घरे परत केली. आता या घरांच्या किंमती कमी व्हाव्यात यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आधी साखळी आंदोलन, नंतर सिडको अधिकाऱ्यांना निवेदन, त्यानंतर इंजेक्शन मोर्चा ही काढण्यात आला. पण सिडको प्रशासनाने मनसेला काही दाद दिली नाही. त्यामुळे आता मनसेने आता वेगळा मार्ग अवलंबला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिडकोच्या घरांच्या अवास्तव किंमतीं विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज वाशी येथे एकदिवसीय भव्य चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्य सरकार आणि सिडकोचे लक्ष वेधून घेण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून उपहासात्मक पद्धतीने याचे उद्घाटन करण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुखवटे घालून या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यासाठी मनसेचे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO News: सिडकोची परत एक मुदत वाढ, माझे पसंतीचे घर योजनेत नवा ट्वीस्ट

पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सामान्य नागरिकांना 50 लाख ते 1 कोटी रुपयांची घरे विकण्याच्या सिडकोच्या धोरणाचा मनसे आणि सिडको सोडत धारकांकडून तीव्र निषेध करण्यात आला. या प्रदर्शनामध्ये घरांच्या किंमती कमी का व्हाव्यात, याची कारणे चित्रांद्वारे प्रभावीपणे मांडली गेली आहेत. या प्रदर्शनासाठी मनसेकडून नागरिक, राजकीय नेते, समाजसेवक व सिडको अधिकारी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सामान्यांचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. याची दखल घेवून तरी सिडको किंमती कमी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Eknath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे खूष नाहीत, अमित शाह यांची घेतली भेट

सिडकोच्या 26,000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यासाठी 21,399 जण लॉटरीसाठी पात्र ठरले होते. त्या पैकी जवळपास 19 हजार 518 जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे. तर उर्वरीत लोकांना सिडकोच्या शिल्लक राहीलेली घरं देण्यात आली आहेत. लॉटरी लागल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न लॉटरीत विजेत्या ठरलेल्या सदनिकाधारकांना पडला होता. आता त्यांना घराचा ताबा मिळेलपर्यंत वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावे लागत आहे. या प्रक्रियेला वेळ लावू नये अशी मागणी सिडको लॉटरी विजेत्यांची होती. पण घराच्या किंमती वरून आता विजेत्यांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यामुळे अनेकांनी घरेही परत केली आहेत.