महिलांवर अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. पुण्यात स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर राज्यात एकच आक्रोश पाहायला मिळाला. हे प्रकरण ताजं असतानाच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याची संतापजनक घटना समोर आली. त्यानंतर आता शिरुर तालुक्यातील कारेगाव इथं एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं एका तरुणीवर सामुहित बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्या अंगावरेच दागिने लुटण्यात आले आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिरुर तालुक्यात कारेगाव आहे. या गावातली एक तरुणी आपल्या मामेभावा बरोबर रात्रीच्या वेळी गप्पा मारत बसली होती. त्यांच्या अजूबाजूला कुणी नव्हते. ते ठिकाण अगदीच निवांत होतं. त्यावेळी तिथे दोन तरुण आले. त्या दोघांनीही मद्य प्राशन केले होते. त्या युवतीला गप्पा मारत बसलेलं पाहिल्यानंतर त्या दोघांच्या डोक्यातील शैतान जागा झाला. त्यांनी त्या युवतीला आणि तिच्या बरोबर असलेल्या मामे भावाला धमकावले.
त्यातूनही ते ऐकत नाहीत असं पाहील्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळचा चाकू बाहेर काढला. चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यांनी मारहाण केले. त्यानंतर त्या तरुणीवर त्या दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला. त्यानेही त्यांचे पोट भरले नाही. त्यांनी त्या युवतीच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. ही घटना रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली.
ट्रेंडिंग बातमी - Vasai News: सर्वजण बहीणीचेच लाड करतात म्हणून अल्पवयीन भावाचे भयानक कृत्य
या घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. शिवाय मदतही मागितली. पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शिवाय त्या दोन नराधम आरोपीच्या मुसक्या ही आवळल्या आहेत. अमोल नारायण पोटे, वय 25 आणि किशोर रामभाऊ काळे, वय 29 अशी अटक केलेल्या दोन आरोपीची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांनी असे गुन्हे याआधी ही केले आहेत का? याची चौकशी केली जात आहे.