Live-in partner murder : लिव्ह-इन-पार्टनरची हत्या, तैनात असलेल्या पोलीस ठाण्यात दिली कबुली; हैराण करणारा गुन्हा

एका सीआरपीएफच्या कॉन्स्टेबलने त्याची लिव्ह-इन-पार्टनर महिला पोलीस अधिकारीची हत्या केली.

जाहिरात
Read Time: 1 min

गुजरातच्या (Gujrat News) कच्छ जिल्ह्यातील एका सीआरपीएफच्या कॉन्स्टेबलने त्याची लिव्ह-इन-पार्टनर (Live-in partner murder) महिला पोलीस अधिकारीची शुक्रवारी हत्या केली आहे. आरोपीचं नाव दिलीप डांगचिा आहे. तो शनिवारी सकाळी अंजार पोलीस ठाण्यात गेला आणि आपला गुन्हा कबुल केला. धक्कादायक बाब म्हणजे पीडिताही याच पोलीस ठाण्यात तैनात होती. आरोपी पोलीस ठाण्यात गेला आणि आपला गुन्हा कबुल केला. अरुणाबेन नटूभाई जादव, कच्छच्या अंजार पोलीस ठाण्यात सहाय्यक उप-निरीक्षक पदावर कार्यरत होती. 

इन्स्टाग्राममधून झाली होती ओळख...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 25 वर्षीय अरुणाबेन आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरसोबत भांडण झालं होतं. यादरम्यान त्याने अरुणाबेनच्या आईबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. अंजार संभागचे DYSP मुकेश चौधरी यांनी सांगितलं की, दोघांमधील वाद टोकाला गेला. यामध्ये दिलीपने रागाच्या भरात अरुणाबेनचा गळा दाबला. 

नक्की वाचा - Navi Mumbai Crime: लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार, गर्भपाताचे फोटो काढले अन्.. नवी मुंबईतील खळबळजनक घटना

आरोपी सीआरपीएफअंतर्गत मणिपूरमध्ये तैनात आहे. तो गेल्या अनेक कालावधीपासून अरुणासोबत नातेसंबंधात आहे. पोलिसांनी सांगितलं की, दोघांचा लग्नाचा प्लान होता. 2021 मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. तेव्हापासून ते एकत्र राहत होते. पोलीस सध्या या प्रकरणात तपास करीत आहे. 

Advertisement


 

Topics mentioned in this article