- स्मार्टफोनवर सेल्फी काढताना नकळत हाताच्या दोन बोटांनी व्ही साइन देण्याची सवय धोक्याची ठरू शकते
- आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बायोमेट्रिक फिंगरप्रिंट्सची चोरी करून बँक खाते रिकामे होवू शकते
- १.५ ते ३ मीटर अंतरावरून घेतलेल्या हाय-क्वालिटी फोटोमधूनही सायबर गुन्हेगारांना फिंगरप्रिंटचा डेटा मिळवता येतो
सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोनवर सेल्फी काढणे आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करणे ही एक फॅशन झाली आहे. फोटो काढताना अनेकदा नकळतपणे हाताची दोन बोटे दाखवून 'व्हिक्टरी' किंवा 'व्ही' (V) साइन देण्याची सवय अनेकांना असते. मात्र, तुमची हीच सवय तुम्हाला आर्थिक संकटात टाकू शकते. सायबर गुन्हेगारांनी आता लोकांचे बँक खाते रिकामे करण्यासाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) चा वापर करून फिंगरप्रिंट चोरी करण्याचा नवा फंडा शोधला आहे. त्यातून ते लोकांची बँक अकाऊंट रिकामी करत आहेत.
सेल्फी काढताना तुम्हीही दोन बोटं दाखवता का? कॅमेरासमोर आला की नकळत V साइन तयार होतं का? मग तुमचं बँक अकाऊंट रिकामं झालंच समजा. कारण फिंगरप्रिंट चोरीचा नवा AI फंडा तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करु शकतो. जर फोटोमधील बोटांची टोकं कॅमेऱ्याकडे असतील, फोटो दीड मीटर अंतरावरून काढला असेल, तर बोटांचे ठसे स्पष्टपणे काढता येतात. दीड ते तीन मीटर अंतरावरून काढलेल्या फोटोंमधूनही अर्धा फिंगरप्रिंट डेटा मिळवता येतो. आपण जर बँकेचा किंवा सोशल मीडियाचा पासवर्ड विसरलो तर तो बदलता येतो. मात्र आपले फिंगरप्रिंट आयुष्यभर बदलता येत नाहीत. त्यामुळे हा बायोमेट्रिक डेटा चोरीला गेल्यास बँक खाती, डिजिटल पेमेंट सिस्टम आणि वैयक्तिक ओळखीला धोका निर्माण होऊ शकतो.
सायबर तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही कॅमेऱ्यासमोर बोटे दाखवून फोटो काढत असाल आणि तो फोटो हाय-क्वालिटी असेल, तर तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स धोक्यात येतात. जर फोटो सुमारे 1.5 मीटर अंतरावरून काढला असेल, तर चोरांना बोटांचे ठसे अगदी स्पष्टपणे मिळवता येतात. अगदी 1.5 ते 3 मीटर अंतरावरून काढलेल्या फोटोंमधूनही सायबर चोरटे सुमारे 50% फिंगरप्रिंट डेटा सहज गोळा करू शकतात. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने या फिंगरप्रिंट्सची हुबेहूब नक्कल तयार केली जाते.
आपण बँकेचा किंवा सोशल मीडियाचा पासवर्ड विसरलो तर तो रिसेट करता येतो. मात्र, आपले फिंगरप्रिंट्स आयुष्यभर बदलता येत नाहीत. हा बायोमेट्रिक डेटा एकदा चोरीला गेल्यास तुमची बँक खाती, डिजिटल पेमेंट सिस्टम (UPI) आणि वैयक्तिक ओळखीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर फोटो शेअर करताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.