जाहिरात

Nashik News: 'आज तुम्हाला कापून टाकतो' मैत्री नाकारल्याचा राग, सहा मैत्रिणींचा विनयभंग, नाशिक हादरले

आरोपीने गाडी भरधाव चालवत, मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न केला. तो ऐवढ्यावरच थांबला नाही. तर त्यांने मुलींसोबत अश्लिल वर्तन ही त्या गाडीत केले.

Nashik News: 'आज तुम्हाला कापून टाकतो' मैत्री नाकारल्याचा राग, सहा मैत्रिणींचा विनयभंग, नाशिक हादरले
  • मैत्री नाकारल्यावर आरोपी दानिश सय्यदने तरुणींवर जबरदस्तीने अपहरण केले
  • आरोपीने सात तरुणींसोबत गाडीमध्ये अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे
  • आरोपीने मुलींना चाकूने धमकावत दहशत निर्माण केली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नाशिक:

राहुल वाघ 

मैत्री करण्यास नकार दिल्याने एका तरुणाने चक्क भयंकर कृत्य केलं आहे. त्याने मैत्री नाकारणाऱ्या मुलीसह तिच्या सहा मैत्रिणींचा विनयभंग केला. शिवाय त्यांना जबरदस्तीने आपल्या गाडीत कोंबले. त्यांच्या सोबत अश्लिल कृत्य केले. ही घटना नाशिकमध्ये घडली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण शहर हादरून गेले आहे. या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबतची तक्रार तात्काळ आडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. 

नाशिकमध्ये मैत्री करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने तरुणीसह तिच्या सहा मैत्रिणींना जबरदस्ती गाडीत बसवले. त्यानंतर त्यांच्या सोबत अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित तरुणाने या मुलींना धमकावले. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्यात दहशत निर्माण केली. असा आरोप या तरुणींनी आपल्या तक्रारीत केला आहे. याबाबतचा गुन्हा आडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

नक्की वाचा - Big News: शाळकरी मुलींना मासिक पाळीची दरमहा 3 दिवसांची सुट्टी जाहीर, सरकारचा ऐतिहासिक निर्णय

तरुणी व तिच्या सोबतच्या सहा मैत्रिणी नांदूर जत्रा लिंक रोड परिसरातून जात होत्या. त्यावेळी आरोपी दानिश सय्यद याने त्यांना अडवले. यावेळी मैत्री करणार का असं आरोपी दानिशने पीडित तरुणीला विचारले. त्यावर तिने नकार दिला. नकार दिल्यानंतर आरोपीने संतापून सर्व मुलींना गाडीत बसण्यास भाग पाडले. जबरदस्तीने त्यांना गाडीत बसवले. यानंतर आरोपीने गाडी भरधाव चालवत, मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न केला. तो ऐवढ्यावरच थांबला नाही. तर त्यांने मुलींसोबत अश्लिल वर्तन ही त्या गाडीत केले. 

नक्की वाचा - Raigad News: कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर ट्वीस्ट, शिवसेना आमदार कन्या निवडणूक लढणार?

 त्याने तिच्या सर्व मैत्रीणीसोबत अश्लिल कृत्य केले. त्यांचा विनयभंग ही केला असा आरोप तरुणींनी तक्रारीत केला आहे. इतकेच नव्हे तर “आज तुम्हाला कापून टाकतो” अशी धमकी देत आरोपीने मुलींमध्ये दहशत निर्माण केली. या प्रकाराने या मुली हादरून गेल्या होत्या. त्या प्रचंड घाबरल्या होत्या. पुढे गेल्यावर मुली गाडीतून खाली उतरल्या. मात्र आरोपी त्यांची पाठ सोडायला तयार नव्हता. त्यांने पुन्हा त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर तो तिथून पसार झाला. पोलीसांनी त्याला शोधून काढत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com