Badlapur case विकृतपणाचा कळस! बदलापूर पोलिसांनी तरुणीला केली अटक

रुतिका प्रकाश शेलार (21 वर्षे) असे या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी चामटोली गावची रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
20 ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी रेल्वे रोको आंदोलन केले होते
ठाणे:

निनाद करमरकर

बदलापुरातील (Badlapur) दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित आणि तिच्या कुटुंबियांबद्दल वाट्टेल त्या अफवा पसरवणाऱ्या एका विकृत तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. रुतिका शेलार (21 वर्षे) असे या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी चामटोली गावची रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बदलापूरच्या दुर्घटनेनंतर बऱ्याच अफवा पसरवण्यात येत असून रुतिकानेही एक अफवा पसरवली होती. तिने पाठवलेला मेसेज व्हायरल झाला होता. बदलापुरातील दुर्घटनेने हादरलेले महाराष्ट्रातील नागरीक या अफवांवर विश्वास ठेवून हळहळ व्यक्त करत होते. सोबतच त्यांचा पोलिसांवरील राग वाढत चालला होता. मात्र जे मेसेज व्हायरल झाले आहेत ते खोटे असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

हे ही वाचा: बदलापूर प्रकरणानंतर प्रशासनात मोठा बदल, भाजपनेही आरोप केलेल्या अधिकाऱ्याची गृहखात्यात वर्णी

सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी सदर प्रकाराबद्दल बोलताना सांगितले की,  "बुधवार दुपारपासून अफवा पसरवण्यात येत आहे. विनाकारण या घटनेशी निगडीत असलेल्या ज्या बातम्या पसरवण्यात येत आहे त्या निराधार आहे. अशा बातम्या पसरवण्यात येणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. " ठाणे सायबर सेलने तांत्रिक पद्धतींचा अवलंब करत ऋतिकाचा माग काढला होता. रुतिकाने गुन्हा कबूल केल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  महाराष्ट्रात 3 वर्षांमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त महिला बेपत्ता !

बदलापूरच्या असंवेदनशील महिला पोलीस अधिकाऱ्याला आणखी एक दणका

ज्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र संतापाने धुमसतोय त्या प्रकरणात एक मोठी घडामोड घडली आहे. पीडित चिमुकलींच्या पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात (Badlapur Police Station) तक्रार करण्यासाठी धाव घेतली होती. या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या शुभदा शितोळे-शिंदे (Shubhada Shitole-Shinde) यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला होता. पीडित चिमुकलींसह त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात 12 तास बसवून ठेवण्यात आलं होतं. एक महिला असूनही अशा प्रकरणात एखादी व्यक्ती इतकी निर्दयी कशी काय असू शकते असा सवाल विचारला जाऊ लागला होता.  या शुभदा शितोळेंचे सरकारने निलंबन केलं होतं. आता या शितोळेंची सरकारने बदलीही केली आहे.

Topics mentioned in this article