Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर हादरलं! गोदाकाठावर आढळला अर्धवट कुजलेला मृतदेह; पोलिसांसमोर मोठं आव्हान

​गोदावरी नदीच्या पात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar :  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील पाटेगाव शिवारातील गोदावरी नदीच्या काठावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. मंगळवारी ही घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नदीकाठी नागरिक गेले असता त्यांना दुर्गंधी सुटल्याचे जाणवले, त्यानंतर हा प्रकार उघड झाला.

​कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

​पाटेगावपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदावरी नदीच्या दुर्गम पात्रात हा मृतदेह पडून होता. मृतदेह अनेक दिवसांपासून पाण्यात किंवा नदीकाठी असल्याने तो अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पैठण पोलिसांना माहिती देऊन पाचारण केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) पैठण येथील शासकीय दवाखान्यात पाठवला आहे.

नक्की वाचा - Palghar News : भाजपच्या विजयी नगरसेवकांच्या मिरवणुकीदरम्यान दोन महिलांना मारहाण; दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू

​पोलीस प्रशासनाकडून ओळख पटवण्याचे आवाहन

​आढळून आलेला मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. मृत व्यक्तीने कोणते कपडे घातले होते किंवा त्याच्याकडे काही ओळख पटतील अशा वस्तू होत्या का, याचा तपास पोलीस करत आहेत. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. आजूबाजूच्या गावांमधून किंवा जिल्ह्यातून कोणी व्यक्ती बेपत्ता आहे का याची माहिती पोलीस रेकॉर्डवरून तपासली जात आहे.

Advertisement

​​पाटेगाव परिसरात दहशतीचे वातावरण

​कुजलेला मृतदेह उघडकीस आल्याने पाटेगाव आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गोदावरी नदीच्या पात्रात अशा प्रकारे मृतदेह आढळल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाकडे या मृत व्यक्तीबद्दल माहिती असेल किंवा कोणाची नातेवाईक व्यक्ती बेपत्ता असेल, तर त्यांनी तात्काळ पैठण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.