मनोज सातवी
वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावात राहाणाऱ्या राठोड कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले आहेत. पती, पत्नी आणि मुलीचा यात समावेश आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत आता पोलीस तपास करत असून मृत्यूचे गूढ वाढले आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने राठोड कुटुंब हादरून गेले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाडा तालुक्यातल्या नेहरोली गावात मुकुंद राठोड याचे कुटुंब 25 वर्षांपूर्वी गुजरातमधून राहण्यासाठी आले होते. ते या गावात आले आणि इथेच स्थायिक झाले. मुकुंद यांच्या बरोबर त्यांची पत्ना कांचन राठो, मुलगी संगित राठोड, दोन मुले सुहास आणि पंकज राहात होते. एकत्र कुटुंब चांगल्या प्रकारे राहात होते. काही वर्षापूर्वी त्यांचा मोठा मुलगा सुहास राठोड हा नोकरी व्यवसायासाठी म्हणून गुजरातमध्ये गेला. तर दुसरा मुलगा विरारमध्ये राहात होता. मुकुंद राठोड पत्नी आणि मुलीसह नेहरोली या गावातच राहात होते.
ट्रेंडिंग बातमी - चॉकलेट चोरल्याचा संशय, तिसरीच्या मुलाला झाडाला बांधलं, पुढे मात्र...
दोन्ही मुलं जरी बाहेर राहात असली तरी ते नेहमी आई वडीलांच्या संपर्कात होती. सुहास हा गुजरातहून त्याच्या आई वडिलांना गेल्या 13 दिवसापासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांना फोन लावत होता. पण कोणताही प्रतिसाद त्याला मिळत नव्हता. काही तरी गडबड तर झाली नाही ना अशी शंका त्याला आली. त्याने तातडीने गुजरात सोडले आणि वाड्याचं नेहरोली गाव गाठवं. ज्या वेळी तो घरी पोहोचला त्यावेळी घराचा दरवाजा हा बंद होता. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला.
ट्रेंडिंग बातमी - 'माफ कर आई, मी तुझी हत्या केली' लेकानं आईचा खून केला अन्...
दरवाज्या उघडल्यानंतर सुहासने जे समोर पाहीले ते पाहून त्याच्या पाया खालची वाळू सरकली. त्याच्या समोर त्याचे वडील मुकुंद बेचलदास राठोड वय 70 वर्षे आई पत्नी कांचन मुकुंद राठोड वय 69 वर्षे आणि बहीण संगीता मुकुंद राठोड वय 51 वर्षे या तिघांचेही मृतदेह समोर पडले होते. हे दृष्ट पाहून सुहासला काही सुचेना झाले. ही बातमी वाऱ्या सारखी गावात पसरली. लोकांनी राठोड यांच्या घराबाहेर गर्दी ही केली. पोलीसांना पाचारण करण्यात आले.
ट्रेंडिंग बातमी - Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे
पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. मृतदेह हे बिछान्यामध्ये होते. तर एक मृतदेह पेटीत आढळून आला. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले. वाडा पोलीसांनी तिघांचे ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रूग्णालयात पाठवले आहेत. ज्या पद्धतीने मृतदेह आढळून आले. त्यावरून ही हत्या आहे की आत्महत्या याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मात्र एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने संपुर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.