जाहिरात

'माफ कर आई, मी तुझी हत्या केली' लेकानं आईचा खून केला अन्...

आईची हत्या केल्यानंतर या क्रुर निर्दयी मुलानं आपल्या इंस्टाग्रामवर त्याच्या सह आईचा फोटो शेअर केला.

'माफ कर आई, मी तुझी हत्या केली' लेकानं आईचा खून केला अन्...
राजकोट:

ज्या मुलाला तळाहाताच्या फोडा सारखं जपलं. मोठं केलं. त्याला हवं नको ते दिलं. त्याच लेकानं आपल्या आईचा घात केला ही मन सुन्न करणारी घटना आता समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. आईची हत्या केल्यानंतर या क्रुर निर्दयी मुलानं आपल्या इंस्टाग्रामवर त्याच्या सह आईचा फोटो शेअर केला. त्यावर त्याने लिहिलं माफ कर आी, मी तुझी हत्या केली. तुझी नेहमीच आठवणे येईल. ओम शांती (Sorry mom, I killed you, I miss you). असा संदेश ही त्यावर त्याने लिहीला. त्यामुळे ज्या कोणी इंस्टावर हीबाब पाहीली वाचली त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही धक्कादायक घटना गुजरातच्या राजकोटमध्ये घडली आहे. राजकोटमध्ये युनिव्हर्सिटी रोड आहे. इथेच 48  वर्षाच्या ज्योतिबेन गोसांई या आपल्या कुटुंबासह राहात होत्या. ज्योतिबेन या मानसिक रुग्ण होत्या. त्यामुळे मुलांबरोबर त्यांची भांडण होत होती. ही भांडण रोज होत असल्याने तिची मुलेही कंटाळली होती. शेवटी या भांडणांना आणि होणाऱ्या त्रासाला कंटाळून ज्योतिबेन यांच्या 21 वर्षाचा मुलगा निलेश याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्याच आईचा या कारणासाठी गळा आवळला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आईचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. फोटोवर त्याने 'Sorry mom, I killed you, I miss you' असं लिहिलं होतं. याची माहिती पोलीसांना मिळाली. तातडीने त्यांनी मुलाला ताब्यात घेतलं. 

ट्रेंडिंग बातमी - 'कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात' सावंत हे काय बोलले?

हा फोटो त्याने इंस्टाग्रामवर टाकल्यानंतर त्याने पोलीसांना फोन केला. आपण आपल्या आईचा खून केला आहे अशी माहिती त्याने स्वत: पोलीसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्यांच्या घरी धडकले. त्यावेळी घरात त्याच्या आईचा मृतदेह होता. तो ही त्या मृतदेहाच्या शेजारीच उभा होता. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी निलेश याला पोलीसांनी अटक केली आहे. त्यानंतर निलेशची चौकशी करण्यात आली. त्यात त्याने काही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे पोलीस ही चक्रावून गेले. 

ट्रेंडिंग बातमी -  'कुणाचा कसा गेम करायचा ते मला कळतं' सत्तारांचे ते वक्तव्य, निशाणा कोणावर?

आईच्या सततच्या त्रासाने तिला मारण्याचं ठरवल्याचे निलेशने सांगितले. त्यामुळे तिला आधी चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चाकू आईने हिसकावून घेतल्याचे निलेशने जबाबात सांगितले. पणनंतर चादरीने आईचे तोंड दाबले. त्यात तिचा मृत्यू झाला असे निलेशने पोलीसांना सांगितले. हत्या केल्यानंतर हा सर्व प्रकार त्याने आपला मित्र भारतला दिला. त्यानंतर पोलीसांना त्यानेच फोन करून ही माहिती दिली. 

ट्रेंडिंग बातमी - Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे

ज्योतीबेन या अनेक वर्षापासून मानसिक दृष्ट्या अजारी होत्या. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. पण त्या घरात सतत कटकट करत होत्या. रोजच घरात त्यामुळे भांडणं होत होती. काही दिवसापासून त्यांनी आपल्या गोळ्या घेणेही बंद केले होते. त्यामुळे त्यांचा स्वभाव आणखी चिडचिडा झाला होता. याच कारणामुळे पतीनेही तिच्या बरोबर घटस्फोट घेतला होता. निलेश आई बरोबर राहात होता. पण त्यांच्या रोजच्या वागण्यामुळे तो ही कंटाळला होता. त्यातूनच त्याने हे टाकोचे पाऊल उचलले. 

( नक्की वाचा - 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीमागचं राजकारण काय?)

दरम्यान हत्या झाल्यानंतर पोलीसांनी ज्योतीबेन यांच्या पतीला याबाबतची माहिती दिली आहे. मात्र त्याने तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. शिवाय ज्योतीबेन बरोबर आपला काही एक संबध नाही असे त्यांनी स्पष्ट पणे सांगितले आहे. त्यामुळे हा मृतदेह कोणाला द्यायचा हा प्रश्न आता पोलीसां समोर आहे. तर दुसरीकडे पोलीसांनी निलेशची रवानगी तुरूंगात केली आहे. शिवाय पोलीस या प्रकरणाचा अधिक तपासही करत आहेत. 

Previous Article
बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात; 'त्या' पोस्टमध्ये सलमानच्या नावाचाही उल्लेख!
'माफ कर आई, मी तुझी हत्या केली' लेकानं आईचा खून केला अन्...
drunken rickshaw driver assaulted traffic policeman in Ulhasnagar video viral
Next Article
उल्हासनगरात मद्यधुंद रिक्षाचालकाची वाहतूक पोलिसाला मारहाण, घटनेचा VIDEO आला समोर