Fake IMEI Racket: 'नकली IMEI' चा खेळ! तुमचा चोरीला गेलेला फोन कसा बनतो गुन्हेगाराची ढाल? वाचा धक्कादायक माहिती

Fake IMEI Racket: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हायटेक गुन्हेगारीचा (Hi-Tech Crime) एक नवा प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Fake IMEI Racket: मागील दोन वर्षांपासून हा अवैध व्यवसाय सुरू होता.
मुंबई:

Fake IMEI Racket: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हायटेक गुन्हेगारीचा (Hi-Tech Crime) एक नवा प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीत एक अशी गुप्त फॅक्टरी कार्यरत होती, जिथे चोरी, लूट आणि सायबर फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरले जाणारे मोबाईल फोन तयार केले जात होते. या फॅक्टरीत जुन्या मोबाईलच्या मदरबोर्डचा वापर करून, IMEI नंबर बदलून (Changing IMEI Number) आणि चीनमधून मागवलेले नवे बॉडी पार्ट्स वापरून बनावट 'नवीन' फोन तयार केले जात होते. दिल्ली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

'सायबरहॉक' (CYBERHAWK) नावाच्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी करोल बाग (Karol Bagh) परिसरातील एका इमारतीत छापा टाकला. या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून, 1826 तयार आणि अर्ध-तयार मोबाईल फोन तसेच IMEI मध्ये छेडछाड करण्यासाठी लागणारे विशेष उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. मागील दोन वर्षांपासून हा अवैध व्यवसाय सुरू होता.

काय आहे प्रकरण?

दिल्ली पोलिसांना मागील 15 दिवसांपासून येथील बीडनपुरा भागात काही संशयास्पद मोबाईल ॲक्टिव्हिटीजची माहिती मिळत होती. बीडनपुरा, गल्ली क्रमांक 22 मधील एका व्यावसायिक इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मोबाईल असेंबलिंग (Assembling) आणि IMEI बदलण्याचा अवैध धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री पटल्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी 'आदित्य इलेक्ट्रॉनिक्स अँड एक्सेसरीज' नावाच्या या युनिटवर छापा टाकला.

( नक्की वाचा : Pune News : ऑपरेशनमध्ये भयंकर चूक! प्रसूतीनंतर पोटात टॉवेल, महिलेचा जीव गेला; पुण्यातील हॉस्पिटलला मोठा झटका )

छापेमारीदरम्यान, 5 लोक जुन्या मोबाईलचे मदरबोर्ड घेऊन त्यांना चीनमधून मागवलेल्या नव्या बॉडी पार्ट्समध्ये बसवत होते. आरोपी लॅपटॉपवर IMEI बदलणारे सॉफ्टवेअर चालवून IMEI नंबरमध्ये फेरफार करत होते आणि तयार झालेल्या फोनची पॅकिंग त्याच ठिकाणी सुरू होती.

स्क्रॅपमधून स्वस्तात खरेदी आणि चीनमधून पार्ट्स

अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, जुने मोबाईल मदरबोर्ड स्क्रॅप डीलर्सकडून विकत घेतले जात होते. दिल्ली-NCR मधील स्क्रॅप मार्केटमधून जुने, तुटलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन अगदी स्वस्त दरात घेतले जात असत. या जुन्या मदरबोर्डसाठी लागणारे आकर्षक, नवे बॉडी पार्ट्स मात्र चीनमधून (China) मागवले जात होते. पार्ट्स सप्लायरच्या माध्यमातून हजारो मोबाईल बॉडी पार्ट्सची शिपमेंट थेट चीनमधून येत होती.

Advertisement

विशेष सॉफ्टवेअर वापरून 'बनावट IMEI'

या युनिटमध्ये WRITEIMEI 0.2.2 / WRITEIMEI 2.0 यांसारख्या खास सॉफ्टवेअरच्या मदतीने मोबाईलचा मूळ IMEI नंबर बदलून (International Mobile Equipment Identity) त्याऐवजी एक बनावट (Fake) IMEI नंबर टाकला जात होता.

IMEI बदलला की, फोनचा मूळ मागोवा (Track) घेणे जवळजवळ अशक्य होऊन बसते. त्यामुळे हे फोन गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांची पहिली पसंती ठरत होते. IMEI बदलल्यानंतर, फोनची आकर्षक पॅकिंग करून तो बाजारात 'नवीन मोबाईल' म्हणून विकला जात होता. हे फोन करोल बाग, गफ्फार मार्केट तसेच दिल्ली-NCR मधील इतर मोबाईल बाजारांमध्ये वेगवेगळ्या चॅनेल्सद्वारे विकले जात होते. हे युनिट मोठ्या प्रमाणावर सुरू होते आणि दर महिन्याला शेकडो बनावट फोन बाजारात पाठवले जात होते.

Advertisement

( नक्की वाचा : Share Market Scam मुंबईत 35 कोटींचा 'शेअर घोटाळा'! 72 वर्षांच्या उद्योजकाला 4 वर्ष फसवले, वाचा नेमके काय घडलं? )
 


छाप्यात जप्त केलेला माल

DCP सेंट्रल, निधान वलसन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या कारवाईत पुढील वस्तू जप्त केल्या आहेत:

  • 1826 मोबाईल फोन (स्मार्टफोन आणि कीपॅड मॉडेल).
  • IMEI बदलण्यासाठी वापरला जाणारा लॅपटॉप.
  • WRITEIMEI 2.0 सॉफ्टवेअर.
  • IMEI स्कॅनर/रीडर मशीन.
  • हजारो मोबाईल बॉडी पार्ट्स.
  • हजारो बनावट IMEI लेबल.

पोलीस आता मदरबोर्डचा पुरवठा करणारे स्रोत, चीनमधून पार्ट्स कोण मागवत होते आणि तयार फोन कोणत्या नेटवर्कद्वारे विकले जात होते, याचा सखोल तपास करत आहेत.
 

Topics mentioned in this article