Crime News : यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डिलिव्हरी बॉयने फोनवर सर न म्हटल्याने त्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. इतकच नाही तर ती व्यक्ती डिलिव्हरी बॉयच्या दुकानात गेली आणि तिथे त्याला धमकी दिली आणि कानशिलात लगावली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, आर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस स्टेशन इनचार्ज (ठाणेदार) केशव ठाकरे यांचं एक पार्सल आलं होतं. त्यांना याबाबत सूचना देण्यासाठी डिलिव्हरी बॉयने ठाकरेंना फोन केला. मात्र त्याने त्यांचं नाव घेताना सर किंवा सन्मानजनक संबोधन न लावल्याने ठाणेदार साहेब भडकले. तेरा नोकर हू क्या इथून संभाषणाची सुरुवात झाली. दरम्यान डिलिव्हरी बॉय नावं निश्चित करावं लागतं असं सांगत होता.
नक्की वाचा - Nagpur Crime : टक्कल पडलं टेन्शन वाढलं, केसांसाठी तो बनला चोर; तरुणाने पोलिसांसमोर मांडली व्यथा!
मात्र ठाकरे साहेब काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. मी ठाणेदार आहे...तुला सर म्हणता येत नाही का? असं म्हणत ते त्याला शिवीगाळ करीत होते. बरं साहेब इथपर्यंत थांबले नाहीत. नाराज ठाणेदारांनी डिलिव्हरी बॉयला आधी फोनवरुन फटकारलं. यानंतर धमकी दिली आणि शेवटी दुकानात जाऊन त्याच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेचा एक सीसीटीव्हीही समोर आला आहे. दोघांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप आणि सीसीटीव्ही व्हिडियो क्लिप व्हायरल झाला आहे. ठाणेदार ज्या पद्धतीने बोलत होते त्यावरुन नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.