देवगड-निपाणी राज्य मार्गावर भीषण अपघात, 3 जण जागीच ठार तर 4 जखमी

हा अपघात रात्री साडेबारा वाजता झाला. मुदाळतीट्टा जवळील सरवडे गावाहून सोळंकुरकडे बोलेरो गाडी चालली होती.

Advertisement
Read Time: 1 min
कोल्हापूर:

देवगड निपाणी राज्य मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत पावलेले सर्व जण कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकुर गावाचे आहेत. त्यामुळे  ऐन गणेशोत्सवात सोळांकुर  गावावर शोककाळा पसरली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा अपघात रात्री साडेबारा वाजता झाला. मुदाळतीट्टा जवळील सरवडे गावाहून सोळंकुरकडे बोलेरो गाडी चालली होती. त्यावेळी या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला आहे. शिवाय या धडकेत गाडीतील तीन जण जागीच ठार झाले. या अपघातानंतर राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ट्रकचालकाला ताब्यात ही घेतलं आहे.  

ट्रेंडिंग बातमी - चिकनपाडा तिहेरी हत्याकांडाचा छडा लागला, आरोपीची एक चुक अन् खेळ खल्लास

या अपघातात मृत्यू झालेले सर्व जण सोळांकुर गावचे रहिवाशी आहेत. शिवाय जखमी ही याच गावचे आहेत. गावात सध्या गणेशोत्सवाचा माहोल आहे. अशा वेळी गावावर या अपघातानंतर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जीवन मरणाशी लढत आहेत. ही बातमी गावात येवून धडकताच गावात एकच सन्नाट पसरला. जखमींना पाहण्यासाठी गावातील लोक रवाना झाले आहेत.