
कर्जतच्या चिकनपाडा इथं गणपतीच्या दिवशीच पती, गर्भवती पत्नी आणि मुलाचे मृत्यूदेह नदीत सापडले होते. त्यांच्या अंगावर वार असल्याचे दिसत होते. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन सणामध्ये हे हत्याकांड झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलीसां समोर याचा छडा लावण्याचे आव्हान होते. त्यात आता पोलीसांना यश आले आहे. या हत्ये मागचे कारण आणि आरोपीने हत्या करण्यासाठी वापरलेली आयडिया पाहात सर्वांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे ही हत्या दुसऱ्या तिसरी कुणी केली नाही तर मृत वक्तीच्या सख्ख्या भावानेच केली असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चिकनपाडा इथं मदन जैतू पाटील आपल्या पत्नी आणि मुलासह राहात होते. हनुमंत जैतू पाटील हा त्यांचा लहान भाऊ होता. तो ही त्यांच्या बाजूलाच राहात होता. हे दोघे ज्या ठिकाणी राहात होते ती जागा मदत याच्या नावावर होती. शिवाय दोघांचे रेशन कार्डही एकच होते. त्यावरून या दोघांमध्ये सतत वाद होत होते. जागेतला हिस्सा द्यावा आणि वेगळे रेशन कार्डसाठी हनुमंत याचा आग्रह होता. यावरून सतत भांडणं होत होती. काही वर्षापूर्वी याच हनुमंतने मदन आणि त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मदन पाटील यांची पत्नी अनिशा पाटील या आशा वर्कर आहेत. त्या सात महिन्याच्या गर्भवतीही होत्या. ही सर्व पार्श्वभूमी समजल्यानंतर पोलीसांनी सर्वात पहीले हनुमंत याला ताब्यात घेतले. शिवाय त्याची पत्नी रेश्मा यांनाही ताब्यात घेण्यात आले.
ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?
हनुमंत याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी ताब्यात घेतल्या नंतर नेरळ पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी त्याचेकडे घटनेच्या रात्री तो कोठे होता? त्याची पत्नी कोठे होती? तो कोणाकडे गेला होता? कोणत्या रस्त्याने गेला होता? कोठे जेवण केले? कोठे कीती वेळ थांबला? कोणाला भेटला? कोठे झोपला? झोपताना बरोबर कोण होते? कोणते कपडे परीधान केले होते? व तो वापरत असलेला मोबाईल यासारखे प्रश्नावली तयार करीत 36 तास चौकशी केली. पण तो कोणत्याच गोष्टीला दाद देत नव्हता. पोलीसांना काहीच क्ल्यू सापडत नव्हता. तो खोटं बोलत आहे हे पोलीसांना समजत होतं. तो दिशाभूल करतोय याचा संशय पोलीसांना आला.
ट्रेंडिंग बातमी - Pune Hit and Run : पुण्यात आणखी एक हिट अँड रन; मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू
पोलीसांनी आणखी खोलात जात परिसरात आणखी चौकशी केली. त्यांच्या हाती एक सीसीटीव्ही फूटेजही लागले. त्या फूटेज मध्ये एक व्यक्ती दिसली. ती हनुमंत सारखी होती. त्यात त्याने सफेद टि शर्ट घातला होता. हत्या ज्या दिवशी झाली त्यावेळचे हे फुटेज होते. हत्या करण्यासाठी जात असताना त्याने सफेद टी शर्ट घातले होते. पण हत्या करून परत येत असताना त्याने ते बदलले होते. ही बाब पोलीसांच्या लक्षात आली. त्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज आरोपीला दाखवण्यात आले. नंतर पोलीसीखाक्या दाखवल्यानंतर हनुमंत याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. एका धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा झाला.
( नक्की वाचा : 'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे', खडसेंचं बाप्पाला साकडं )
भावाची हत्या करायची याची तयारी हनुमंत याने आधीच केली होती. भावाच्या घरी गणपती येतो असं असतानाही त्याने आपल्या पत्नीला माहेरी पाठवले. स्वता घरी न थांबता पोशीर इथं मामाच्या गावाला गेला. रात्री सर्व जण झोपले असताना तो भावाच्या घरी गेला. तिथे कुऱ्हाडीच्या सहाय्याने आधी भावाला नंतर वहीनीला आणि मुलाला त्याने ठार केले. त्यांचा खून नाही तर आत्महत्या झाली आहे यासाठी त्याने त्यांचे मृतदेह घरा शेजारी असलेल्या नदीत टाकून दिले. सकाळी गावकऱ्यांना जेव्हा लहान मुलाचा मृतदेह दिसला त्यावेळी ते हादरून गेले. त्याच्या घरी गेले असता त्यांना घरी कोणी दिसले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्या आई वडीलांचा शोध घेतला. त्यावेळी त्यांचेही मृतदेह नदीत सापडले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world