Dhananjay Munde's resignation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. त्यांची हत्या कशी करण्यात आली याबाबत आपण आतापर्यंत ऐकलं होतं. या हत्येचे अत्यंत संतापजनक फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. संतोष देशमुख यांचे अतोनात हाल करण्यात आले, त्यांच्या सोबत सेल्फी मोडवर फोटो काढताना आरोपी दात काढून हसत होते, त्यांच्यावर लघुशंकाही करण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर वरदहस्त असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असल्याचं निश्चित झालं आहे. संतोष देशमुखांवरील अत्याचाराचे संतापजनक फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
नक्की वाचा - Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या छळाचे फोटो समोर आल्यानंतर मुंबईत हालचालींना वेग
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे नेते उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांचा मृतदेहाची विटंबना केल्याचा गुन्हा केज पोलिसात दाखल होणार आहे. आधी या प्रकरणात हत्या, खंडणी आणि ॲट्रॉसिटी असे गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरील अत्याचाराचे फोटो समोर आल्यानंतर मृतदेहाची विटंबना केल्याचा गुन्हा केज पोलिसात दाखल होणार आहे.