Dhule Crime : धुळे जिल्ह्यातून (Dhule News) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एक हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. पती-पत्नीमध्ये वाद होत असतात. मात्र याच वादामुळे शिरपूर तालुक्यातील थारनेरमध्ये दोन चिमुकल्यांचा बळी गेला आहे. जन्मदाता बापच वैरी झाला आणि मुलांचा दुर्देवी शेवट झाला. स्वत:च्या रागावर नियंत्रण न राहिल्याने या बापाने आपल्या दोन मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून दिलं आहे. या बापाने तापी नदीच्या पुलावरून नदीपात्रात फेकल्याची धक्कादायक (Crime News) घटना समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात ही घटना घडली आहे. या गावात संजय कोळी यांचं कुटुंब राहतं. संजय कोळी यांना दोन लहान मुले होती. घटनेच्या दिवशी संजय कोळी यांचा कोणत्या तरी कारणावरून पत्नीशी किरकोळ वाद झाला. हा वाद पुढे जाऊन इतका विकोपाला गेला की, संजय कोळी याने त्याच्या काळजाचा तुकडा असलेल्या दोन चिमुकल्यांना तापी नदी पात्रात फेकून त्यांचा जीव घेतला आहे. या घटनेनंतर संजय कोळी हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी थाळकर पुरुष ठाण्यात संजय कोळी यांच्या विरोधात पुन्हा असा झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तापी नदीत शोधमोहीम सुरू केली. दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
नक्की वाचा - Crime News : मुलीचा आनंद पाहवेना; आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून कुटुंबांचं घृणास्पद कृत्य
काही दिवसांपूर्वी पुतण्याने काकाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. काका दारु पिऊन सतात शिवागाळ करत होता. हे पुतण्याला सहन झालं नाही. कुटुंबीयांना सतत होणाऱ्या शिवीगाळमुळे तो त्रासला होता. त्यातूनच त्याने काकाचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यासाठी मित्राची मदत ही घेतली. काकाचा काटाही काढला. पण एक चुक त्याला महागात पडली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. ही घटना धुळ्यात घडली आहे. पोलिसांनी एका छोट्या पुराव्याच्या आधारावर या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना गजाआड केले आहे. धुळे पोलिसांनी काही तासात या खुनाचा शोध लावला.