Dhule Crime: पेढ्यातून गुंगीचे औषध, अश्लील VIDEO अन् 2 वर्ष अत्याचार.. मुख्याध्यापकाच्या दुष्कृत्याने खळबळ

गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल रामभाऊ बोरसे, वय 53, रा. विवेकानंद नगर देवपूर धुळे, या मुख्याध्यापकाला अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागिंद मोरे, धुळे:

Dhule News: पेढ्यातून गुंगीचे औषध देत शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची  धमकी देत मुख्याध्यापकाने महिलेकडून ६० लाख रुपये उकळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या सव्वा दोन वर्षांपासून नराधम मुख्याध्यापक संबंधित महिलेवर अत्याचार करत होता. याप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्या आला असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. 

नेमकं काय घडलं? 

आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळून सलग सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापका विरोधात 41 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल रामभाऊ बोरसे, वय 53, रा. विवेकानंद नगर देवपूर धुळे, या मुख्याध्यापकाला अटक केली आहे.

Palghar News: लिंबू, शेंदूर, गुलाल अन् लाल कापड... दृश्य पाहून फुटला घाम, गावात असं काय घडलं?

संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती. या आर्थिक  मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केला. एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पिडित महिलेसोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओही काढला.

हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 59 लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार केला. अखेर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement

Vasai News : वसईत संताप! फक्त 5 मिनिटे उशीर, शिक्षिकेच्या क्रूर शिक्षेमुळे सहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू?

 दरम्यान, पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत गजाआड केले आहे तसेच सध्या त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे...