- मोलकरणीला लग्नाचे आमिष दाखवून सलग 10 वर्षे बलात्कार
- धुरंधर सिनेमातील अभिनेता गजाआड
- लग्न करण्यास नकार दिल्याने अभिनेत्याविरोधात तक्रार
Dhurandhar Actor arrested: एकीकडे धुरंधर सिनेमाची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरू आहे तर दुसरी अतिशय धक्कादायक बाब समोर आलीय. या ब्लॉकबस्टर सिनेमातील एका अभिनेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सोमवारी (26 जानेवारी 2026) समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये एका अभिनेत्याला अटक करण्यात आलीय. स्वतःच्या मोलकरणीवर तब्बल 10 वर्षे बलात्कार केल्याचा आरोपाखाली अभिनेत्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आलीय. नदीम खान असे अटक करण्यात आलेल्या अभिनेत्याचे नाव आहे.
महिलेची तक्रार आणि पोलिसांनी अभिनेत्याला ठोकल्या बेड्या
नदीम खानने नुकतेच ब्लॉकबस्टर ठरलेल्या धुरंधर सिनेमामध्ये रहमान डकैतच्या (अक्षय खन्ना) घरातील स्वयंपाकी अखलाकची भूमिका साकारलीय. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनुसार नदीम खानला 22 जानेवारी रोजी अटक करण्यात आलीय आणि सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
तक्रारीनुसार, महिलेने वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या घरामध्ये काम केले होते आणि ती काही वर्षांपूर्वी खानच्या संपर्कात आली, ज्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नदीम खानने पीडित महिलेला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर तब्बल 10 वर्षे अनेकदा बलात्कार केला. यानंतर अभिनेत्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. यानंतर पीडित महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
(नक्की वाचा: Sagar Karande: सागर कारंडेविरोधात कोणी कटकारस्थान केले? इंडस्ट्रीत आता माझे मित्र नाहीत, अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं)
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित बलात्कार पहिल्यांदा तक्रारदाराच्या घरी घडला होता, जे ठिकाण मालवणी पोलिसांच्या अखत्यारीत येते आणि पीडित महिला त्याच परिसरात राहते, त्यामुळे वर्सोवा पोलिसांनी 'झीरो एफआयआर'च्या आधारे प्रकरण हस्तांतरित केले आहे.
(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)