Gadchiroli News : डॉक्टरने तरुणीचं वारंवार केलं लैंगिक शोषण, घटनेमागचं कारणही थक्क करणारं..आष्टीत खळबळ

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Gadchiroli Doctor Crime News

मनीष रक्षमवार, प्रतिनिधी

Gadchiroli Crime News Today : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.डॉ.बिजन प्रधान सरकार असं आरोपी डॉक्टरचं नाव आहे. आष्टी येथे त्याचे ‘नमिता हॉस्पिटल'नावाचे क्लिनिक आहे.अटक करण्यात आल्यानंतर सद्यस्थितीत आरोपी डॉक्टरची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत  रवानगी केली आहे.या धक्कादायक घटनेमुळे आष्टी व गडचिरोली परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

डॉक्टरने लग्नाला स्पष्ट नकार दिला अन् जे घडलं..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी डॉक्टर बिजन सरकारने संबंधित पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. 'तुझ्याशीच लग्न करेल',असं ठाम आश्वासन त्याने तरुणीला दिले होते.या आश्वासनाच्या आणि विश्वासाच्या आधारावर आरोपीने वेळोवेळी तरुणीशी शरीरसंबंध ठेवून तिचे शारीरिक व मानसिक शोषण केले.मात्र,काही दिवसांनंतर जेव्हा तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली,तेव्हा डॉक्टरने लग्नाला स्पष्ट शब्दांत नकार देत पाठ फिरवली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने तातडीने पोलिसांत धाव घेतली.

Advertisement

नक्की वाचा >> Nagpur News: नागपूरला बसणार अल निनोचा फटका? पाणी टंचाईचं संकट घोंगावणार? सद्यस्थितीची A To Z माहिती वाचा

लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होताच आरोपी गजाआड

पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात आरोपी डॉ.बिजन प्रधान सरकार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये फसवणूक आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला बेड्या ठोकल्या.त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी जेलमध्ये केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.