जाहिरात

Nagpur News: नागपूरला बसणार अल निनोचा फटका? पाणी टंचाईचं संकट घोंगावणार? सद्यस्थितीची A To Z माहिती वाचा

नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत नागपूर,गोंदिया,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.या विभागात 12 मोठे,43 मध्यम आणि 315 लघु, अशा एकूण 370 धरणे व बॅरेज प्रकल्प आहेत.

Nagpur News: नागपूरला बसणार अल निनोचा फटका? पाणी टंचाईचं संकट घोंगावणार? सद्यस्थितीची A To Z माहिती वाचा
Al Nino Impact On Nagpur Water Supply

Nagpur Water Resources Department : नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत नागपूर,गोंदिया,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.या विभागात 12 मोठे,43 मध्यम आणि 315 लघु, अशा एकूण 370 धरणे व बॅरेज प्रकल्प आहेत.गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे पाणी धरणात येत आहे. याशिवाय कॅचमेंट भागातील जमिनीच्या मातीत पाणी मुरत आहे.पाऊस नियमित सुरू राहिल्यावर हे पाणी धरणांत जमा होईल.विदर्भातील या प्रकल्पांद्वारे दरवर्षी सिंचन तसेच पिण्याचे व औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा केला जातो. 

विभागातील 370 प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 4926.70 दलघमी असून मृत पाणीसाठा 983.90 दलघमी आहे.11 जून 2026 रोजी या प्रकल्पांमध्ये 1704.96 दलघमी (36.21 टक्के)उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.मागील वर्षी याच दिवशी 1383.41 दलघमी (29 टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता.त्यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत 321.55 दलघमी म्हणजेच जवळपास 7 टक्के अधिक पाणीसाठा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नक्की वाचा >> Shirdi News: शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला जाताय? मंदिरातील 'हा' व्हिडीओ एकदा बघाच

'या' कालावधीसाठी पाणी वापराचे नियोजन निश्चित

जलसंपदा विभागाने 11 जून ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी पाणी वापराचे नियोजन निश्चित केले आहे. त्यानुसार पिण्याच्या पाण्यासाठी 80.10 दलघमी,औद्योगिक वापरासाठी 44.62 दलघमी आणि बाष्पीभवनामुळे 153.56 दलघमी पाण्याचा वापर अपेक्षित आहे.या कालावधीत एकूण 278.28 दलघमी पाण्याचा वापर होणार असून सध्या सिंचनासाठी कोणतेही पाणी आरक्षित करण्यात आलेले नाही.

जलसंपदा विभागाच्या अंदाजानुसार 1 सप्टेंबर 2026 रोजी जलाशयांमध्ये 1426.68 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे.उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर विभागात सध्या पाणीटंचाईची परिस्थिती नसल्याचे नमूद करण्यात आले.परंतु,विविध प्रयोजनांसाठी आकस्मिक पाणी आरक्षणासंदर्भात क्षेत्रीय स्तरावर मागण्या प्राप्त होत आहे.अशा मागण्यांवर संबंधित जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी,असे निर्देश सिचंन विभागाकडून देण्यात आले आले. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com