जाहिरात

Dombivli News: डोंबिवलीतील कुख्यात बिल्डर प्रफुल गोरेचा आणखी एक काळा कारनामा उघड, ग्राहकाची पोलिसांत धाव

डोंबिवलीतील कुख्यात बिल्डर प्रफुल गोरे याच्याविरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने एका नागरिकाची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

Dombivli News: डोंबिवलीतील कुख्यात बिल्डर प्रफुल गोरेचा आणखी एक काळा कारनामा उघड, ग्राहकाची पोलिसांत धाव
Dombivli Builder Praful Gore Crime News

Dombivli Crime News Today: डोंबिवलीतील कुख्यात बिल्डर प्रफुल गोरे याच्याविरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने एका नागरिकाची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गोरेविरोधात गुन्हा नोंदवला आहे.सध्या प्रफुल गोरे जेलमध्ये आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे एक अनधिकृत इमारत तयार केल्याप्रकरणी त्याला काही दिवसापूर्वी अटक झाली होती.

नोंदणीसाठी ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक पैशांची मागणी

डोंबिवली पश्चिम येथील सखाराम कॉम्प्लेक्स परिसरात राहणाऱ्या दीप्तीप्रसाद अजितकुमार अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.तक्रारीनुसार, प्रफुल  गोरे (आदित्य बिल्डकॉन,शिवआराधना कॉम्प्लेक्स,सखाराम कॉम्प्लेक्स,डोंबिवली पश्चिम) याने तक्रारदाराकडून फ्लॅट क्रमांक 802 च्या खरेदीसाठी 16 लाख 15 हजार रुपये स्वीकारून नोटरी करारनामा केला होता.मात्र करारानंतर संबंधित फ्लॅट तयार न करता गोरे याने तक्रारदाराला फ्लॅट क्रमांक 804 चा ताबा दिला. त्यानंतर नोंदणीसाठी ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक पैशांची मागणी केली. 

नक्की वाचा >> Cockroach Janta Party ट्रेंडमध्ये, महाराष्ट्रातील झुरळे गोपीनाथ मंदिराचीही प्रचंड चर्चा, झुरळांना मानतात देव

ग्राहकाला 20 लाख रुपये परत देण्याचे आश्वासन दिले, पण..

धक्कादायक बाब म्हणजे,संबंधित फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचेही त्याने तक्रारदाराला सांगितलं, असा आरोप आहे.त्यानंतर तक्रारदार ग्राहकाला 20 लाख रुपये परत देण्याचे आश्वासन देत धनादेश देण्यात आला.मात्र फ्लॅटसाठी दिलेली 16 लाख 15 हजार रुपयांची रक्कम तसेच फर्निचर,पीओपी, ग्रिल, पंखे,लाईट,पाण्याची टाकी आणि दुरुस्तीवरील जवळपास 4 लाख रुपयांचा खर्च असा एकूण 20 लाख 15 हजार रुपयांचा परतावा न देता फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318 (4) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.पी.पाटील करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com