Dombivli News : डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर एका तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी (7 ऑगस्ट) घडली.रोहित कटके असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेतून रोहित बचावला आहे. त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे रुग्णालय वादाच्या भाेवऱ्यात सापडले आहे. बिलाच्या वादातून तरुणाने हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत असले तरी रुग्णालय प्रशासनाने बिलाचा वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात रोहितची आई मंदा कटके यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना दीड वर्षांपासून कॅन्सर झाला आहे. मंदा कटके यांना काल (बुधवार, 6 ऑगस्ट) उपचारासाठी ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज संध्याकाळी (7 ऑगस्टर) रोहितने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला.
रोहीत जेव्हा रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर पाेहचला होता. त्यावेळी त्याला वाचविण्याकरीता अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याला वाचविण्यापूर्वीच त्याने चौथ्या मजल्यावरुन उडी घेतली. त्याला तात्काळ एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
( नक्की वाचा : Kalyan News : म्हाडाच्या प्रकल्पावरुन कल्याणमध्ये महायुतीत चांगलीच जुंपली, आजी-माजी आमदार आमने-सामने )
अग्नीशमन दलाचे वाहन रोहीतला वाचविण्याकरीता आली तेव्हा अग्नी शमन दलाच्या जवानांनी योग्य ते प्रयत्न केले नाही. केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोप जागरुक नागरीक मिलिंद दिवाडकर यांनी केला आहे. तर अग्नीशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, त्यांच्याकडे जंपिंग शीट होती. ती त्याने लावण्याचा प्रयत्न केला. त्या पूर्वीच त्याने उडी मारली होती. त्यांच्याकडे नेट नव्हते. हे अग्नीशमन दलाच्या जवानांनी मान्य केले.
रोहितने बिलाच्या वादातून उडी घेतली असल्याची माहिती रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांच्या नातेनवाईकांनी दिली. रुग्णालयाकडून जास्तीचे बिलाची आाकरणी केली जात असल्याचा आरोप काही रुग्णांच्या नातेवाईकांनी यावेळी केला.
मात्र रोहितने नक्की कशाच्चया कारणास्तव उडी घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला याचे कारण अद्याप सष्ष्ट झालेले नाही. मात्र रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, आम्हालाही नक्की कारण माहिती नाही. त्याच्या आई कर्करोग ग्रस्त आहे. तिच्यावर उपचार सुरु आहे. त्याच्या आईचा मेडिक्लेम आहे. त्यामुळे बिलाच्या वादातून त्याने उडी मारल्याचा अन्य रुग्णांचा आरोप निराधार आहे. रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या रुग्णालयातील खिडक्यांना ग्रील नाही. ही बाब देखील या घटनेतून समोर आली आहे.