Dombivli : भाजपा नेत्यावरील हल्ला प्रकरणात डोंबिवलीच्या माजी नगरसेवकांना मोठा दिलासा, वाचा कोर्टात काय घडलं?

Dombivli News: महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या या घटनेमुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivli Crime News: कनिष्ठ न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
कल्याण:

Dombivli News: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान  डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी ओमनाथ नाटेकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला करण्यात आला होता प्रकरणात आता शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह सहा जणांना कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून कोठडीत असलेल्या आरोपींचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या या घटनेमुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

काय आहे प्रकरण?

महापालिका निवडणुकीच्या काळात डोंबिवलीतील तुकाराम परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. पैसे वाटपाच्या वादातून हा संघर्ष पेटला आणि त्याचे रूपांतर थेट प्राणघातक हल्ल्यात झाले. या हिंसक झटापटीत भाजप पदाधिकारी ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले होते. 

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह इतर आरोपींना अटक केली होती. अटकेनंतर तब्येत खालावल्यामुळे दोन्ही माजी नगरसेवकांवर काही काळ रुग्णालयात उपचार देखील सुरू होते.

( नक्की वाचा : Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचे अपघाती निधनाबद्दल 5 मोठे प्रश्न, रोहित पवारांनी मागितली उत्तरं )

कसा मिळाला जामीन?

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोलिसांनी रवी पाटील, नितीन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांसह इतर आरोपींना न्यायालयात हजर केले होते. सुरुवातीला त्यांनी अंतरिम जामिनासाठी केलेला अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी त्यांच्या वकिलांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला आणि त्यावर 7 फेब्रुवारी रोजी सुनावणी पार पडली.

Advertisement

 मात्र त्यावेळी न्यायाधीश एन. वासाडे यांनी जामीन नाकारला होता. गुन्ह्यातील कलमे का कमी केली गेली आणि त्याला आधार काय, तसेच एक्स-रे आणि मेडिकल रिपोर्ट सादर न केल्याचे कारण देत त्यावेळी हा जामीन फेटाळण्यात आला होता.

( नक्की वाचा : Ajit Pawar Death: अजित पवारांचा पायलटच गेम प्लॅनचा भाग होता? रोहित पवारांनी सांगितला मोसादचा 'तो' थरारक पॅटर्न )

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

कनिष्ठ न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायाधीश पी. मुळे यांच्यासमोर या अर्जावर महत्त्वाची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश मुळे यांनी या प्रकरणातील सहा जणांचा जामीन मंजूर केला. यामध्ये माजी नगरसेवक रवी पाटील, नितीन पाटील यांच्यासह रोशन पाटील, यश पाटील, आनंद ठाकूर आणि रवी कोळसकर यांचा समावेश आहे. 

Topics mentioned in this article