Dombivli News : 'बिहारमध्ये कामाची कमी नाही, तुम्हीच...'; डोंबिवलीत परप्रांतीयाची मुजोरी; संतापजनक व्हिडिओ

महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र मानलं जाणाऱ्या डोंबिवलीतून मराठीचा अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dombivli News : मुंबईत अनेकदा मराठी बोलण्यावरुन हिंदी भाषिकांसोबत वाद झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मुंबईत तर देशभरातून मोठ्या संख्येने लोक कामासाठी येत असतात. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधून मोठ्या संख्येने नागरिक मजुरी करण्यासाठी मुंबई आणि जवळपासच्या शहरांमध्ये नियमित येत असतात. यातून अनेकदा भाषिक वाद निर्माण होतो.

आता तर महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र मानलं जाणाऱ्या डोंबिवलीतून मराठीचा अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे तर हिंदी भाषिकाने 'मी मराठी शिकणार नाही' अशा शब्दात अरेरावी केली. मात्र त्याची मुजारी फार काळ टिकली नाही. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी खाक्या दाखविताच मुजोर परप्रांतीय मजुराने माफी मागितली. 

Advertisement

नक्की वाचा - Badlapur News : श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या 'ती'ला मोठी अद्दल; 23 दिवसांपासून तुरुंगातून...

नेमकं काय घडलं? 

डोंबिवली स्टेशन परिसरातील एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील सार्वजनिक शौचालयात एक मराठी व्यक्ती गेला होता. या व्यक्तीकडे सुटे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने मी ऑनलाइन पैसे पाठवतो असं शौचालयातील परप्रांतीय कामगाराला सांगितलं. यावरून शौचालयातील परप्रांतीय आणि त्या व्यक्तीमध्ये वाद झाला. कामगार व्यक्तीवर चिडला आणि त्याच्यासोबत हुज्जत घालू लागला. यानंतर त्या व्यक्तीने कामगाराला मराठीत बोलण्यास सांगितलं. मात्र कामगार मराठी बोलण्यास तयार नव्हता. तो पुढे म्हणाला, . "मी मराठी शिकणार नाही, आमच्या बिहारमध्ये कामाची कमी नाही, तुम्हीच आम्हाला बोलावता," ... यावरून संतापलेल्या व्यक्तीने मनसे पदाधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. मनसे पदाधिकारी यांनी कामगाराकडे याबाबत जाब विचारताच त्या मुजोर कामगार नरमला आणि त्याने माफी मागितली. 

Topics mentioned in this article